खाद्य तेलाच्या किमती गगनाला; 11 वर्षातील सर्वाधिक वाढ

ग्राहक प्रकरणांशी संबंधित वेबसाईटवरील माहितीनुसार, वर्षभरात खाद्य तेलांच्या दरात 20 ते 56 टक्के वाढ झाली आहे. एकीकडे महागाई, कोरोना साथरोग आणि लॉकडाऊन यासोबत संघर्ष सुरू असतानाच खाद्य तेलाच्या किमतीत झालेल्या दरवाढीमुळे सामान्य माणसाचे बजेटही कोलमडले आहे.

    दिल्ली : गेल्या वर्षभरात खाद्य तेलाच्या किमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे. गेल्या 11 वर्षाच्या तुलनेत ही सर्वात मोठी दरवाढ असल्याचेही सांगण्यात येते. एका अहवालानुसार मोहरीच्या तेलाच्या दरात 44 टक्के वाढ झाल्यामुळे किरकोळ बाजारात या तेलाच्या किमती 171 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढल्या होत्या.

    गेल्या वर्षी मे महिन्यात एक लीटर मोहरीच्या तेलाची किंमत 118 रुपये होती, तर सूर्यमुखी तेलाच्या किमतीतही 50% वाढ झाली आहे. भारतात मोहरी, शेंगदाणा, वनस्पती, सोयाबीन, सूर्यमुखी आणि पाम तेलाचा खाद्यपदार्थात वापर केला जातो.