election commission

निवडणूक आयोगाने १२ राज्यातील १४ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. यासोबतच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील प्रत्येकी एका लोकसभा मतदारसंघातही निवडणुका होतील. सर्व ठिकाणी १७ एप्रिल रोजी मतदान होईल आणि १५ दिवसानंतर २ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. ज्या विधानसभा मतदारसंघात पोटनिडवणुका होत आहेत त्यात राजस्थानातील तीन आणि मध्यप्रदेशातील एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

    दिल्ली : निवडणूक आयोगाने १२ राज्यातील १४ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. यासोबतच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील प्रत्येकी एका लोकसभा मतदारसंघातही निवडणुका होतील. सर्व ठिकाणी १७ एप्रिल रोजी मतदान होईल आणि १५ दिवसानंतर २ मे रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. ज्या विधानसभा मतदारसंघात पोटनिडवणुका होत आहेत त्यात राजस्थानातील तीन आणि मध्यप्रदेशातील एका विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

    राजस्थानात सहाडा, सुजानगढ आणि राजसमंद मतदारसंघात पोटनिवडणूक होईल. राजस्थनातील या तीन विधानसभा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघात कांग्रेस आणि एका मतदारसंघात भाजपाने निवडणूक जिंकली होती. सहाडा मतदारसंघात काँग्रेस आमदार कैलाश त्रिवेदी आणि सुजानगढ येथे मास्टर भंवरलाल यांचे निधन झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. तर राजसमंद मतदारसंघातील भाजपा आमदार किरण माहेश्वरींच्या निधनामुळे जागा रिक्त झाली होती. येथे उदयपूरमधील वल्लभनगर मतदारसंघातही पोटनिवडणू होणार आहे. तथापि या निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली नाही. मध्यप्रदेशातील दमोह विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होत आहे. येथील काँग्रेस आमदार राहुलसिंह लोधी यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे येथे पोटनिवडणूक होत आहे.

    पंढरपूर विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे नुकतेच निधन झाले. या रिक्त जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १७ एप्रिल रोजी मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने या बाबत कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र या निवडणुकीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत.

    पोटनिवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार २३ मार्च पासून अर्ज दाखल करण्यात येणार असून 30 मार्च रोजी अंतिम मुदत आहे. तर अर्जाची छाननी ३१ मार्च रोजी असून, ३ एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. १७ एप्रिल रोजी मतदान व २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज आहेत. शिवसेनेचे समाधान आवताडे आणि शैला गोडसे यांनी प्रचाराला सुरवात केली आहे. त्यामुळे पोटनिवडणूक देखील चुरशी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.