1 जूनपासून लागू होणार EPFO चा नवा नियम , जाणून घ्या

ईपीएफओच्या नव्या नियमांतर्गत, नियोक्ताला (Employer) पीएफ अकाउंट आधारशी लिंक (PF Account link to Aadhaar) करण्याची जबाबदारी दिली आहे. जर नियोक्ताकडून अकाउंट आधारशी लिंक केलं न गेल्यास, कर्मचाऱ्याच्या अकाउंटमध्ये कंपनीकडून दिली जाणारी रक्कम (PF Contribution) रोखली जाऊ शकते.

    नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रॉविडेंट फंड अकाउंट होल्डर्ससाठी (PF Subscribers) 1 जून 2021 पासून नवा नियम लागू (EPFO New Rule) करत आहे. या नियमानुसार असलेल्या अटी पूर्ण न केल्यास, कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीशी (Employer) याबाबत बोलून ही अट पूर्ण करावी, असं सांगण्यात आलं आहे.

    ईपीएफओच्या नव्या नियमांतर्गत, नियोक्ताला (Employer) पीएफ अकाउंट आधारशी लिंक (PF Account link to Aadhaar) करण्याची जबाबदारी दिली आहे. जर नियोक्ताकडून अकाउंट आधारशी लिंक केलं न गेल्यास, कर्मचाऱ्याच्या अकाउंटमध्ये कंपनीकडून दिली जाणारी रक्कम (PF Contribution) रोखली जाऊ शकते.

    EPFO च्या नव्या नियमानुसार, पीएफ सब्सक्रायबर्सचा UAN नंबर आधारशी वेरिफाईड होणं गरजेचं आहे. ईपीएफओने सामाजिक सुरक्षा संहितेच्या कलम 142 (Social Security Code) अंतर्गत हा निर्णय घेतला आहे.

    नियोक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत, की 1 जून 2021 नंतर जर कोणतं अकाउंट आधारशी लिंक नसेल किंवा UAN आधारशी वेरिफाईड केलं नसेल, तर इलेक्ट्रॉनिक चालान रिटर्न (ECR) भरता येणार नाही. त्यामुळे सब्सक्रायबर्ससाठी आपलं पीएफ अकाउंट आधारशी लिंक करणं महत्त्वपूर्ण आहे.