कारमध्ये एकटी व्यक्ती असेल तरी मास्क सक्तीचा, घरात एकट्या व्यक्तीलाही मास्क बंधनकारक, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय

दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानुसार कार ही वैयक्तिक मालमत्ता असली तरी सार्वजनिक ठिकाणी चालवली जाते. त्यामुळे कारमध्ये व्यक्ती एकटी असेल, तरी तिनं मास्क लावणं बंधनकारक आहे. केवळ कारमध्येच नव्हे, तर घरीदेखील व्यक्तीनं मास्क लावणं बंधनकारक असल्याचं न्यायालयानं म्हटलंय. कारमधील एकट्या व्यक्तींना मास्कची सक्ती करण्यात येत असल्याबद्दल काही याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी करताना कोर्टानं हे आदेश दिलेत. 

    सध्या देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. अशा परिस्थितीत इतर सर्व खबरदारी घेण्यासोबत मास्क लावणे बंधनकारक आहे. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी मास्क लावला नाही, तर दंडदेखील आकारला जातो. मात्र जर एखादी व्यक्ती त्याच्या कारमधून काचा बंद करून एकटीच प्रवास करत असेल, तर तिनं मास्क लावणं बंधनकारक आहे का, याचं उत्तर दिल्ली उच्च न्यायालयानं दिलंय.

    दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानुसार कार ही वैयक्तिक मालमत्ता असली तरी सार्वजनिक ठिकाणी चालवली जाते. त्यामुळे कारमध्ये व्यक्ती एकटी असेल, तरी तिनं मास्क लावणं बंधनकारक आहे. केवळ कारमध्येच नव्हे, तर घरीदेखील व्यक्तीनं मास्क लावणं बंधनकारक असल्याचं न्यायालयानं म्हटलंय. कारमधील एकट्या व्यक्तींना मास्कची सक्ती करण्यात येत असल्याबद्दल काही याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी करताना कोर्टानं हे आदेश दिलेत.

    कारमधील एकट्या व्यक्तीनं मास्क लावला नसेल, तर त्याला दंड आकारण्यात येऊ नये, अशी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना कार ही खासगी मालमत्ता असली तरी रस्ता ही सार्वजनिक जागा असल्यामुळे मास्क लावणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मास्क हे सुरक्षाकवच असून तो लावणे अत्यावश्यक असल्याचं न्यायालयानं म्हटलंय.

    दिल्लीत कोरोनाचे रुग्ण वाढू लागलेत. त्यामुळे दिल्लीत नाईट कर्फ्यु लावण्यात आलाय. रात्री १० वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत हा कर्फ्यु असणार आहे.