१० वी नापास तरी परदेशी मुलीने प्रेमापोटी केलं पास ; जाणून घ्या ‘या’ रिक्षाचालकाची अजब प्रेम कहाणी

राज हा दहावी नापास तरूण आहे. अवघ्या १६ वर्षांचा असतानाच राजने रिक्षा घेऊन ती चालवण्यास सुरुवात केली. यावेळी राजला टुरिस्टना इंप्रेस करण्यासाठी रिक्षाचालक इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश आणि इतर भाषा बोलतात, असं लक्षात आलं. यानंतर राजने इंग्लिश शिकण्यास सुरु केलं.

    नवी दिल्ली : राजस्थान येथील एक दहावी नापास रिक्षाचालक प्रेमात चक्क स्वीत्झर्लंडमध्ये पोहोचला असल्याचा प्रकार समोर आला आहे. रिक्षाचालकाचे नाव रंजित सिंह राज असं आहे. रंजीतची प्रेयसी ही फ्रान्सची असल्यामुळे तो देखील तिकडेच रहिवासी झाला आहे.

    राज हा दहावी नापास तरूण आहे. अवघ्या १६ वर्षांचा असतानाच राजने रिक्षा घेऊन ती चालवण्यास सुरुवात केली. यावेळी राजला टुरिस्टना इंप्रेस करण्यासाठी रिक्षाचालक इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश आणि इतर भाषा बोलतात, असं लक्षात आलं. यानंतर राजने इंग्लिश शिकण्यास सुरु केलं.

    अनेक परदेशी राजस्थानला फिरायला येत असायचे. याचवेळी एक तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत राजस्थानला आली होती. तेव्हा राज त्यांना गाईड करत होता. यावेळी त्यांची चांगळी ओळख देखील झाली. संबंधित तरुणी आपल्या देशी परतल्यानंतर राज आणि ती स्काईपवर बोलत होते. यादरम्यान दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली.

    दरम्यान, आपल्या प्रेमासाठी राजने अनेक वेळा फ्रांन्सला जाण्यासाठी विझा अप्लाय केला होता. मात्र न मिळाल्याने दोघांनी मिळून फ्रान्स दुतावासाकडे उपोषण चालू केले. यानंतर राज फ्रान्सला पोहोचल्यानंतर त्याने लाँग टर्म व्हिसासाठी अर्ज केला. राज आता आपली पत्नी आणि मुलासह जेनेव्हा येथे राहतात.