सर्वसामान्यांना मोठा झटका! आजही रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती

देशातील जवळपास 11 राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांपेक्षा जास्त आहेत. या 11 राज्यांच्या यादीमध्ये राजस्‍थान, बिहार, आंध्र प्रदेश, कनार्टक, तेलंगणा, मध्‍य प्रदेश, महाराष्‍ट्र, जम्‍मू आणि कश्‍मीर, ओडिशा, तमिळनाडू आणि लडाख आहे. देशभरात सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या गंगानगरमध्ये मिळत आहे.

    नवी दिल्ली: पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये आज (Petrol-Diesel Price Today) पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. सरकारी तेल कंपन्यांनी आजही इंधनाच्या दरात वाढ केली आहे. सध्या देशभरातील विविध शहरात सोन्याच्या किंमती सर्वोच्च स्तरावर (Petrol-Diesel Rates at Record High) पोहोचल्या आहेत.

    मुंबईमध्ये पेट्रोलमध्ये (Petrol Price in Mumbai) दर 105.58 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे (Diesel Price in Mumbai) दर 96.91 रुपये प्रति लीटर आहेत. देशातील जवळपास 11 राज्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांपेक्षा जास्त आहेत. या 11 राज्यांच्या यादीमध्ये राजस्‍थान, बिहार, आंध्र प्रदेश, कनार्टक, तेलंगणा, मध्‍य प्रदेश, महाराष्‍ट्र, जम्‍मू आणि कश्‍मीर, ओडिशा, तमिळनाडू आणि लडाख आहे. देशभरात सर्वात महाग पेट्रोल राजस्थानच्या गंगानगरमध्ये मिळत आहे.