नव्या माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यांचं पालन करण्याचे शक्य ते प्रयत्न केले जातील; ट्विटरचे केंद्र सरकारला आश्वासन

केंद्र सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी ट्विटरला शेवटची नोटीस पाठवण्यात आली होती. तसेच जर नियमांचे पालन करण्यात येणार नसेल तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला होता. यानंतर बुधवारी रात्री उशीरा नव्या माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यांचं पालन करण्याचे शक्य ते प्रयत्न केले जातील, असं आश्वासन ट्विटरनं केंद्र सरकारला दिलं आहे.

    नवी दिल्ली : केंद्र सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी ट्विटरला शेवटची नोटीस पाठवण्यात आली होती. तसेच जर नियमांचे पालन करण्यात येणार नसेल तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला होता. यानंतर बुधवारी रात्री उशीरा नव्या माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यांचं पालन करण्याचे शक्य ते प्रयत्न केले जातील, असं आश्वासन ट्विटरनं केंद्र सरकारला दिलं आहे.

    जवळपास तीन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने समाजमाध्यम क्षेत्रात सेवा पुरवणाऱ्या ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, अशा कंपन्यांसाठी नवी नियमावली जारी केली. तसेच, या नियमावलीमधील तरतुदींचं पालन करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देखील दिली. २६ मे पासून देशात नवी नियमावली लागू करण्यात आली. मात्र, सोशल मीडियावरील एक लोकप्रिय माध्यम असलेल्या ट्विटरनं या नियमावलीनुसार अंमलबजावणी केली नसल्यामुळे आता केंद्र सरकारने ट्विटरला शेवटचा इशारा दिला होता. याआधी २६ मे आणि २८ मे रोजी केंद्र सरकारने ट्विटरला पत्र पाठवून देखील त्यावर कार्यवाही न झाल्यामुळे अखेर केंद्र सरकारने शेवटची नोटीस ट्विटरला पाठवली होता. यानुसार अंमलबजावणी न झाल्यास परिणामांना तयार राहण्याचा इशारा देखील केंद्र सरकारने नोटिशीमध्ये दिला होता.

    ट्विटर (Twitter) आणि केंद्र सरकारमध्ये सुरु असलेल्या वादाला अखेर पूर्ण विराम मिळणार आहे.  ट्विटर नव्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे,” असं ट्विटरच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं. “आम्ही आमच्या यासंदर्भातील वाटचालीची माहिती भारत सरकारकडे सुपुर्द केली आहे. आम्ही सतत सरकारशी सकारात्मकरित्या चर्चा करत राहू,” असंही त्यांनी नमूद केलं.

    हे सुद्धा वाचा