pm narendra modi to distribute property cards under swamitva scheme
ग्रामीण भारतात बदलांचे वारे, स्वामित्व योजनेंतर्गत (swamitva scheme) संपत्ती कार्ड वितरणाचा मोदींच्या हस्ते शुभारंभ

कोरोनाचे संकट मोठे आहे. अशा वेळी जेव्हा कोरोनावरील लस उपलब्ध होईल, तेव्हा प्रत्येकाला ही लस मिळेल आणि कोणीही सुटणार नाही, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना दिला.

दिल्ली : देशात अनेक कंपन्यांकडून कोरोना लसीचे ट्रायल सुरू आहेत. येत्या काही महिन्यांत कोरोनावरील लस प्रत्यक्षात बाजारात येण्याचा अंदाज आहे. भारत सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे आणि लोकांना करण्यात आलेल्या मदतीमुळे असंख्य लोकांचा जीव वाचला आहे. लॉकडाऊन लागू करणे आणि नंतर तो काढण्याच्या म्हणजे अनलॉकच्या प्रक्रियेचे टायमिंग पूर्णपणे योग्य होते, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

सतर्कता गरजेची

कोरोनाचे संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात लोकांनी अधिक सतर्क राहिले पाहिजे. सध्याची वेळ ही कशाही प्रकारे ढिले राहण्याची नाही, असा इशाराही त्यांनी मुलाखतीत दिला आहे. कोरोनावरील लस अद्याप आली नसली तरी भारत सरकारकडून आतापासूनच लस वितरणाची तयारी सुरू आहे. लस आल्यानंतर वितरणाच्या नियोजनात वेळ जाऊ नये, यासाठी ही तयारी केली जात आहे. देशातील सर्व नागरिकांना लस उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने सरकारने प्राथमिक टप्प्यात ५० हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. एका व्यक्तीला लस देण्यासाठी सुमारे 3८५ रुपये इतका खर्च येईल, असा अंदाजही सरकारी पॅनेलने वर्तवला आहे.

पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट गाठण्याची शक्यता

भारत अजूनही २०२४ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट गाठू शकतो असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. आर्थिक सुधारणा सुरूच राहतील पण राज्यांनीही गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करावे, असे पंतप्रधान म्हणाले. कोरोना व्हायरस संकटात किती जीव वाचवण्यात आपण यशस्वी ठरलो, यावर मोहिमेचं यशापयश मोजले जावे असेही ते म्हणाले. परकीय गुंतवणुकात १3 टक्के वाढ झाल्याचा दावाही त्यांनी केला.

अर्थव्यवस्था रुळावर येत आहे

पंतप्रधान म्हणाले की, भारतात कृषी, एफडीआय, उत्पादन आणि वाहनांच्या विक्रीत तेजी दिसून आली आहे. ईपीएफओमध्ये सहभागी होणारे अधिक लोक नोकर्‍या देखील वाढल्या असल्याचे दर्शवित आहेत. भारताची अर्थव्यवस्था सावरण्याच्या मार्गावर आहे असेही ते म्हणाले.