Everyone's favorite brand from the poor to the rich; This is how Bata Chappal's company started in India; For the first time in 126 years, a major change has taken place in this company

नवी दिल्ली : भारतात गरीबांपासून श्रीमंतांपर्यत बाटा हा सगळच्यांचाच आवडता ब्रँड आहे. १२६ वर्षांत पहिल्यांदाच या कंपनीत मोठा बदल झालाय.  बाटा शू ऑर्गनायझेशन (Bata shoe Organization) कंपनीचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) संदीप कटारिया (sandeep kataria)  यांची जागतिक स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली आहे.

संदीप कटारिया हे बाटा कंपनीत जागतिक पदावर काम करणारे पहिले भारतीय ठरले आहेत. एलेसिक्स नसार्ड यांच्या जागी कटारिया यांची निवड करण्यात आली आहे. २०१७  मध्ये बाटा इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कटारिया रुजू झाले होते. येथूनच त्यांचा या कंपनीतील प्रवास सुरू झाला होता.

अशी सुरु झाली बाटा कंपनी

बाटा ही मुळची चेक रिपब्लिक देशातील कंपनी आहे. १८९४ मध्ये टॉमस बाटा यांनी ही कंपनी सुरू केली. रबर आणि लेदरच्या शोधात ही कंपनी भारतात दाखल झाली. यानंतक १९३९ मध्ये कोलकाता येथे कंपनीचं कामकाज सुरू झालं. बाटानगरमध्ये या कंपनीनं देशातील पहिलं शूजनिर्मिती यंत्र बसवलं. आज भारत हा बाटाचा दुसऱ्या क्रमाकांचा बाजार आहे. देशभरात बाटाची १३७५ किरकोळ विक्रीची दुकान आहेत. सुमारे ८५०० कर्मचारी यात काम करतात. यंदा कंपनीने सुमारे ५ कोटी शूजची विक्री केली आहे. ९० देशांमध्ये या कंपनीचा विस्तार आहे. कंपनीत सुमारे ३० हजार कर्मचारी कार्यरत असून कंपनीची पाच हजार दुकाने आहेत.

पुढील ५० वर्षांचा विचार करून बाटानं मोजे, लेदरचं साहित्य, रसायनं, टायर, रबरच्या वस्तूंची निर्मिती करून कंपनीचा विस्तार केला. त्यामुळे बाटा ही एक कंपनी न राहता तो एक ग्रुप बनला होता. त्यानंतर लवकरच बाटा ही जगातील सर्वात मोठी शूज निर्यातदार कंपनी म्हणून नावारुपास आली.