एक्झिट पोल पुन्हा फेल; सर्वांचेच अंदाज चुकले

निवडणुकीत ओपिनियन पोलद्वारे स्थितीचा आढावा घेणाऱ्या वृत्त वाहिन्या आणि सर्व्हेक्षण संस्थांचे सर्व अंदाज मतदारांनी फोल ठरविले आहेत. बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जींचा तृणमूल आणि भाजपाला मिळणाऱ्या संभाव्य जागा यावर सर्वच वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे एक्झिट पोल निष्प्रभावी ठरले. आज तक, इंडिया टिव्ही, रिपब्लिक टिव्हीसह सर्व्हेक्षण करणारी संस्था जन की बात ने भाजपाला तृणमूलपेक्षा सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. आता प्रत्यक्ष निकाल हाती येताच भाजपाला १०० जागाही मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

  दिल्ली : निवडणुकीत ओपिनियन पोलद्वारे स्थितीचा आढावा घेणाऱ्या वृत्त वाहिन्या आणि सर्व्हेक्षण संस्थांचे सर्व अंदाज मतदारांनी फोल ठरविले आहेत. बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जींचा तृणमूल आणि भाजपाला मिळणाऱ्या संभाव्य जागा यावर सर्वच वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे एक्झिट पोल निष्प्रभावी ठरले. आज तक, इंडिया टिव्ही, रिपब्लिक टिव्हीसह सर्व्हेक्षण करणारी संस्था जन की बात ने भाजपाला तृणमूलपेक्षा सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. आता प्रत्यक्ष निकाल हाती येताच भाजपाला १०० जागाही मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

  ममतांच्या नेतृत्वातील तृणमूल काँग्रेस तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करणार आहे. ज्या वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी तृणमूलचा विजय होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता तो सुद्धा चुकला आहे. कोणीच ममतांच्या पक्षाला १७० पेक्षा जास्त जागा मिळणार नसल्याचे म्हटले होते. जेव्हाकि मतमोजणीवेळी तृणमूलने २०० पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली होती.

  असा होता एक्झिट पोलचा अंदाज

  • इंडिया टिव्हीने भाजपाला सर्वाधिक १९२ जागा तर तृणमूलला ८८ मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात याउलट निकाल हाती आले.
  • आज तक  एक्सीस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्येही भाजपाला १३४ ते १६० आणि तृणमूलला १३० ते १५२६ जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. हा अंदाजही फोल ठरला.
  • जन की बातने १७४ जागांसह भाजपा सत्ता स्थापन करणार असल्याचे म्हटले होते हा दावाही फोल ठरला आहे.
  • सी व्होटर आणि टाईम्स नाऊ आणि एबीपीच्या एक्झिट पोलमध्ये तृणमूलला १५२-१६४ तर भाजपाला १०९-१२१ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हा अंदाज तृणमूलच्या विजयाशी मिळताजुळता असला तरी जागांच्या मोजणीनुसार मात्र चुकीचाच ठरला आहे.
  • रिपब्लिक-सीएनएक्सच्या एक्झिट पोलमध्ये बंगालमध्ये त्रिशंकू विधानसभेचे भाकित करण्यात आले होते ते सुद्धा फोल ठरले आहे.