mask

मास्क वापरल्याने कोरोना साथीचा प्रसार होत नाही आहे. तसेच मास्क शरीराची रोगप्रतीकारशक्ती वाढवण्यासाठीही मदत करत आहे. असे संशोधनातून समोर आले आहे. असा दावा 'न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिकल' मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

दिल्ली : कोरोना साथीचा (coronavirus) प्रसार देशात वेगाने पसरत आहे. त्यामुळे कोरोनाची लागण होऊ (preventing infection ) नये यासाठी नागरिकांना मास्क (Face masks ) वापरण्याचा सल्ला सुरुवातीपासूनच दिला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्व राज्यांनी जनतेला मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. परंतु मास्क वापरल्याने मानवी शरीराला फायदा होत असल्याचा दावा शास्त्रज्ज्ञांनी केला आहे.

मास्क वापरल्याने कोरोना साथीचा प्रसार होत नाही आहे. तसेच मास्क शरीराची रोगप्रतीकारशक्ती वाढवण्यासाठीही मदत करत आहे. असे संशोधनातून समोर आले आहे. असा दावा ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिकल’ मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे जॉर्ज डब्ल्यू रुदरफोर्ट आणि मोनिका गांधी यांनी दिलेल्या माहीतीनुसार, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फेस मास्क वॅरियोलेशन प्रमाणे काम करु शकतं. त्याचसोबत संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्याचंही काम करते.

संशोधकांनी असा दावा केला आहे की, फेस मास्क ड्रॉपलेट्ससोबत बाहेर येणाऱ्या संसर्गजन्य तत्वांना फिल्टर करु शकतो. यामुळे शिंकताना किंवा खोकताना मास्कचा वापर केल्यास संसर्ग अगदी कमी प्रमाणात मास्कमधून बाहेर पडू शकतो.