#ResignModi फेसबुकने केला ब्लॉक, चूक लक्षात आल्यावर दिलगिरी, पुन्हा हॅशटॅग रिस्टोर

सरकारच्या आदेशावरूनच फेसबुकनं तो हॅशटॅग बॅन केला असावा, अशी चर्चा समाजमाध्यमांमध्ये त्यानंतर सुरू झाली. मात्र सरकारच्या आदेशावरून नव्हे, तर चुकून हा हॅशटॅग आमच्याकडून बॅन करण्यात आला होता, असा खुलासा फेसबुकनं केलाय. आपली चूक मान्य करत फेसबुकनं हा हॅशटॅग पुन्हा रिस्टोर केला. 

    देशात कोरोनाची दुसरी लाट हाताळण्यात सपशेल अपयशी ठरल्याबद्दल केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज असलेल्या नेटिझन्सनी फेसबुकवर एक हॅशटॅग सुरू केला होता. #ResignModi असं त्या हॅशटॅगचं नाव. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पदावरून पायउतार व्हावं, अशी मागणी कऱणारा हा हॅशटॅग फेसबुकवर गाजत होता. मात्र अचानक तो ब्लॉक करण्यात आला.

    सरकारच्या आदेशावरूनच फेसबुकनं तो हॅशटॅग बॅन केला असावा, अशी चर्चा समाजमाध्यमांमध्ये त्यानंतर सुरू झाली. मात्र सरकारच्या आदेशावरून नव्हे, तर चुकून हा हॅशटॅग आमच्याकडून बॅन करण्यात आला होता, असा खुलासा फेसबुकनं केलाय. आपली चूक मान्य करत फेसबुकनं हा हॅशटॅग पुन्हा रिस्टोर केला.

    फेसबुकनं याबाबत दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटलंय की चुकून हा हॅशटॅग आमच्याकडून ब्लॉक करण्यात आला. याबाबत भारताच्या केंद्र सरकारकडून कुठलीही सूचना देण्यात आली नव्हती. आमची चूक आमच्या लक्षात आली आहे. हा हॅशटॅग पुन्हा रिस्टोर करण्यात आला आहे.

    अनेकदा ऑटोमॅटिक पद्धतीनं काही हॅशटॅग ब्लॉक होत असतात. अंतर्गत मार्गदर्शक तत्वांवर आधारित ही कार्यप्रणाली सुरू असते. लेबलशी संबंधित एरर आल्यामुळेच हा हॅशटॅग बॅन करण्यात आल्याची माहिती फेसबुकनं दिलीय.