कुटुंबीयांना कोरोना संसर्ग झाल्यास मिळणार देखभाल रजा; केंद्राची नवी योजना

आई-वडिलांसह घरातील सदस्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांच्या देखभालीसाठी आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना स्पेशल कॅज्युअल लिव्ह (एससीएल) मिळणार आहे. केंद्रीय वैयक्तिक मंत्रालयाने काढलेल्या एका आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. जर केंद्र सरकारच्या कोणत्या कर्मचाऱ्याच्या घरी आई-वडिलांसह इतर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास आणि त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली तर संबंधित कर्मचाऱ्याला 15 दिवसांसाठीची एससीएल मिळणार आहे. या सुट्यांव्यतिरिक्त त्यांच्या हक्काची रजाही त्यांना घेता येणार आहे. याद्वारे आपल्या पालकांना डिस्चार्ज मिळेपर्यंत ते सुट्या घेऊ शकतात, असे मंत्रालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

  दिल्ली : आई-वडिलांसह घरातील सदस्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांच्या देखभालीसाठी आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना स्पेशल कॅज्युअल लिव्ह (एससीएल) मिळणार आहे. केंद्रीय वैयक्तिक मंत्रालयाने काढलेल्या एका आदेशात ही माहिती देण्यात आली आहे. जर केंद्र सरकारच्या कोणत्या कर्मचाऱ्याच्या घरी आई-वडिलांसह इतर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास आणि त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली तर संबंधित कर्मचाऱ्याला 15 दिवसांसाठीची एससीएल मिळणार आहे. या सुट्यांव्यतिरिक्त त्यांच्या हक्काची रजाही त्यांना घेता येणार आहे. याद्वारे आपल्या पालकांना डिस्चार्ज मिळेपर्यंत ते सुट्या घेऊ शकतात, असे मंत्रालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

  … तर 20 दिवसांची थेट सुटी

  कोरोनाच्या या संकटकाळात भारत सरकारच्या वैयक्तिक मंत्रालयाकडे (पर्सनल मिनिस्ट्री) कोविड-19 रुग्णालयात भरती होण्यामुळे देखभाल आणि क्वारंटाईनच्या काळासंदर्भात सुट्यांबाबत अनेक लोकांनी चौकशी केली होती. याची दखल घेत मंत्रालयाने याबाबत एक विस्तृत आदेश जाहीर केला आहे. सरकारी कर्मचारी कोरोना संकटामळे खूपच अडचणीतून जात असल्याचेही या आदेशात म्हटले आहे. जर एखादा सरकारी कर्मचारी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास त्या व्यक्तीला 20 दिवसांची थेट सुटी मिळू शकते. रुग्णालयातून घरी आल्यानंतर होम आयसोलेशनमध्ये रहायचे असल्यासही त्याला सुटी मिळू शकते.

  डिस्चार्ज कार्ड दाखविल्यास मिळणार लाभ

  जर कोरोना संक्रमित कर्मचारी रुग्णालयात भरती झाला आणि त्याला 20 दिवसांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात रहावे लागत असेल तर त्याला डिस्चार्ज कार्ड दाखवल्यास सुटी मिळू शकते. तसेच एखाद्या कर्मचाऱ्याला विशेष कॅज्युअल लिव्ह म्हणून 15 दिवसांची सुटी मिळू शकते. याचबरोबर, केंद्रीय कर्मचारी जर कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्यास आणि ती होम आयसोलेशनमध्ये राहिल्यास त्याला सुरुवातीला 7 दिवसांसाठी ऑनड्युटी मानले जाईल, असे पर्सनल मंत्रालयाने आदेशात म्हटले आहे.

  हे सुद्धा वाचा