#FarmersProtest (LIVE) | सुधारणा नको, कायदेच रद्द करा, शेतकरी भूमिकेवर ठाम, चर्चेच्या सहाव्या फेरीबाबत संभ्रम | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट10 महीने पहले

सुधारणा नको, कायदेच रद्द करा, शेतकरी भूमिकेवर ठाम, चर्चेच्या सहाव्या फेरीबाबत संभ्रम

ऑटो अपडेट
द्वारा- Amol Joshi
कंटेन्ट रायटर
11:19 AMDec 09, 2020

अकाली दलाचे कार्यकर्ते वाटतायत मोफत पेट्रोल

केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शिरोमणी अकाली दलाचे कार्यकर्ते सध्या दिल्ली-अमृतसर महामार्गावरील पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना मोफत पेट्रोल पुरवण्याचं काम करत आहेत. अधिकाधिक शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी दिल्लीतील आंदोलनात सहभागी व्हावं, यासाठी आपण हे करत असल्याचं अकाली दलाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. 

08:47 AMDec 09, 2020

चर्चेच्या सहाव्या फेरीबाबत संभ्रम

मंगळवारच्या 'भारत बंद'नंतर आज (बुधवारी) होणाऱ्या शेतकरी आणि सरकारमधील चर्चेकडं सर्वांचं लक्ष होतं. मात्र मंगळवारी रात्री गृहमंत्री अमित शाहांनी १३ शेतकरी संघटनांच्या नेत्यांसोबत चर्चा केली. सरकार कृषी कायद्यांमध्ये बदल करायला तयार असल्याचं शाहांनी सांगितलं. मात्र कायद्यात बदल किंवा सुधारणा करण्याचा प्रश्नच येत नाही. कायदेच रद्द करावेत, या मागणीवर शेतकरी ठाम राहिले.

आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना नेमका काय प्रस्ताव द्यायचा, हे निश्चित होणार आहे. सरकारचा प्रस्ताव अगोदर आम्ही वाचू आणि मगच चर्चेला जायचं की नाही, ते ठरवू असं शेतकऱ्यांनी म्हटलंय. कायदे मागे घ्यायला सरकार तयार नसेल, तर मग पुढे चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे.

गेल्या १३ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर सुरू असणारं शेतकरी आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी मंगळवारी गृहमंत्री अमित शाह यांनी पुढाकार घेतला. विविध १३ शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा केली. मात्र या चर्चेतून काहीच तोडगा निघू शकला नाही.

शेतकऱ्यांना नव्या कायद्यातील जे मुद्दे आक्षेपार्ह वाटतात, ते बदलण्यासाठी एक प्रस्ताव तयार करून तो सरकारकडे पाठवण्यात यावा, असा तोडगा गृहमंत्री अमित शाह यांनी सुचवला. मात्र शेतकऱ्यांनी तो फेटाळून लावत हे कायदेच रद्द करण्याची आपली मागणी लावून धरली आहे. आज (बुधवारी) या आंदोलनावर काही तोडगा निघतो का, याकडं सर्वांचं लक्ष आहे.

आज (बुधवारी) सकाळी केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक होणार असून या बैठकीत शेतकऱी आंदोलनाबाबत सरकार आपली भूमिका नक्की करणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसोबत सरकारच्या चर्चेची सहावी फेरी पार पडणार आहे. मात्र या चर्चेसाठी जाण्यापूर्वी आम्ही एकत्र बसून सरकारच्या प्रस्तावावर चर्चा करू, असं शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय.

आमच्या मागण्यांचा प्रस्ताव देऊन कायद्यात बदल करण्याचा सरकारचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही. हे काळे कायदे परत घेण्याची आमची मागणी आहे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. बैठकीला उपस्थित असणाऱ्या शेतकरी नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार कायदे रद्द करायला तयार नाही. चर्चेच्या सहाव्या फेरीत या कायद्यात काही बदल केले जातील याचे तपशील सरकार लेखी देऊ शकेल. मात्र आम्हाला हा कायदाच नको असल्यामुळे त्याच कुठल्या सुधारणा करण्याचा प्रश्नच येत नाही. सरकार जोपर्यंत कायदे मागे घेण्याचं किंवा रद्द करण्याचं आश्वासन देत नाही, तोपर्यंत आमचं समाधान होऊ शकत नाही, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२६ रविवार
रविवार, सप्टेंबर २६, २०२१

महाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.