Today Bharat Band | कृषी कायदद्यांच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाला चार महिने पूर्ण ; दिल्लीच्या सीमांवर उमटू लागले बंदचे पडसाद | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव्ह ब्लॉग
अंतिम अपडेटMarch, 26 2021

कृषी कायदद्यांच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाला चार महिने पूर्ण ; दिल्लीच्या सीमांवर उमटू लागले बंदचे पडसाद

द्वारा- Prajakta Dhekale
डिजिटल कंटेन्ट रायटर
09:39 AMMar 26, 2021

गाझीपूर (दिल्ली-यूपी) सीमेवरील एनएच -२ वरील वाहतूक बंद

 

शेतकरी आंदोलकांनी पुकारलेल्या भारत बंद मुळे गाझीपूर (दिल्ली-यूपी) सीमेवरील एनएच -२ ((दोन्ही कॅरेज वे) वरील  वाहतूक बंद  करण्यात आल्याची माहिती दिल्ली वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

09:24 AMMar 26, 2021

गाझीपूर सीमेवर शेतकरी आंदोलकांनी नृत्य व गाण्यातून निषेध

१२ तासांच्या 'भारत बंद'च्या हाकेत सहभागी झालेल्या शेतकरी आंदोलकांच्या गटाने  गाझीपूर सीमेवर (दिल्ली-यूपी)  गाणे व नृत्य करत केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे.

 

09:18 AMMar 26, 2021

हरियाणात शेतकऱ्यांनी रेल्वे ट्रकवर रोखला

  केंद्र सरकारने केलेल्या  कृषी कायद्याच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या पुकरण्यात आलेल्या  १२ तासाच्या 'भारत बंद' ला हरियाणातील अंबाला परिसरात  शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत शाहपूरजवळ जीटी रोड आणि रेल्वे ट्रॅक रोखत धरणे आंदोलन केले.

 

नवी दिल्ली: केंद्र सरकारने तयार केलेलया तीन कृषी कायद्यांच्या विरोधात देशातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आज तब्बल चार महिने पूर्ण होत आहे. चार महिन्यानंतरही सरकारने कायदेमागे घेण्याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नसल्याचे निषेध व्यक्त करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर  शेतकरी आंदोलकांनी पुकारलेल्या बंदचे पडसाद दिसू लागले आहेत.

दिल्ली-गाझीपूरवरील हायवे केला बंद
गाझीपूर सीमेवर शेतकरी आंदोलनाला बसल्याने पोलिसांनी वाहतूक बंद ठेवली आहे. शेतकरी रस्त्यावर बसून आंदोलन करत आहेत. दिल्लीच्या ज्या सीमांवरआंदोलन सुरु आहे त्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत संयुक्त मोर्चाचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सांगितले की, रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद केली जाणार आहे. बाजारदेखील बंद केले जाणार असल्याचे माहिती त्यांनी दिली आहे.


संयुक्त किसान मोर्चाचे नागरिकांना बंद यशस्वी करण्याचे केले आवाहान

शेतकरी आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे काम करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चा या शेतकरी आंदोलक संघटनेनें नागरिकांना बंद यशस्वी करण्याचे केले आवाहान केले आहे. केंद्रसरकारने बनवलेल्या काळया तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आज चार महिने पूर्ण होत आहेत. सरकारचा निषेध म्हणून आज पुकारण्यात आलेल्या बंदला यशस्वी करावे असे आवाहन शेतकरी नेते बुटासिंग बुर्जगिल यांनी केले आहे.

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं संभ्रम निर्माण होतोय का?

View Results

Loading ... Loading ...
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.