Farmers' agitation simmered, DIG of Punjab prisons Laxminder Singh Jakhar resigned to support the agitation

शेतकऱ्यांना आता पाठिंबा देण्यासाठी पंजाबच्या डीआईजी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनात खेळाडू, कलाकार यांच्यासह आता नोकरशाह देखील सामील झाले आहेत. मी माझ्या शेतकरी बांधवांसोबत म्हणत पंजाबच्या डीआयजींनी थेट आपला राजीनामा दिला आहे.

दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा  (Farmers’ agitation) आज १७वा दिवस आहे. गेल्या १९ दिवसानंतर शेतकरी केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत. या १९ दिवसाच्या आंदोलनात एकूण ११ शेतकऱ्यांनी आपले प्राणही गमावले आहेत. या आंदोलनावर राज्यातील अनेक नेत्यांनी टीका केली आहे. केंद्र सरकार शेतकरी कायदे रद्द न करण्यावर ठाम असल्यामुळे दिवसेंदिवस आंदोलनाचे स्वरुप तीव्र होत आहे. त्यातच आता शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंजाबमधील कारागृहाचे डीआयजी (DIG of Punjab prisons) लखविंदरसिंग जाखड  (Laxminder Singh Jakhar) यांनी आज राजीनामा दिला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या अठरा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या दरम्यान सरकारसोबत अनेक बैठकांच्या फेऱ्या झाल्या परंतु काही ठोस तोडगा निघाला नाही. सरकार आपल्या मतावर ठाम आहे. तर शेतकरीही आपल्या मतावर ठाम राहिले आहेत. परंतु सरकार शेतकरी कायद्यात दुरुस्त्या करण्यास तयार आहे. पंजाब सीमेवर शेतकरी आंदोलन चिघळल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांनी तेथील महामार्ग रोखून धरला आहे. कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि वाणिज्यमंत्री पीयूष गोयल शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत.

शेतकऱ्यांना आता पाठिंबा देण्यासाठी पंजाबच्या डीआईजी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनात खेळाडू, कलाकार यांच्यासह आता नोकरशाह देखील सामील झाले आहेत. मी माझ्या शेतकरी बांधवांसोबत म्हणत पंजाबच्या डीआयजींनी थेट आपला राजीनामा दिला आहे. लखविंदरसिंग लाखड यांनी मुख्य गृह सचिवांकडे राजीनामा सोपविला आहे. राजीनामा पत्रात त्यांनी असे लिहिले आहे की, . ‘मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी कृषी कायद्यांविरोधात शांततेत आंदोलन करणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांसोबत आहे. यामुळे मी राजीनामा देत आहे. अशा आशयाचे राजीनामा पत्र लखविंदर सिंग जाखड यांनी लिहिले आहे.