Farmers denied to make group for discussion next meeting on Thursday AJ | समिती नको, सर्वांशी चर्चा करा, शेतकऱ्यांनी फेटाळला सरकारचा प्रस्ताव, दिल्लीच्या सीमेवर वाहतुकीला मनाई | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट7 महीने पहले

समिती नको, सर्वांशी चर्चा करा, शेतकऱ्यांनी फेटाळला सरकारचा प्रस्ताव, दिल्लीच्या सीमेवर वाहतुकीला मनाई

ऑटो अपडेट
द्वारा- Amol Joshi
कंटेन्ट रायटर
09:53 AMDec 02, 2020

दिल्लीच्या सीमा वाहतुकीसाठी बंद

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिकरी, जरोडा आणि जतिक्रा सीमेवर वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. तर बदुसराय सीमेवर केवळ दुचाकींना परवानगी देण्यात आलीय.

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींशी केंद्र सरकारनं चर्चेच्या मार्गे तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू केली. मंगळवारी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर, रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी ३५ संघटनांच्या शेतकऱ्यांशी झालेली चर्चा ही सकारात्मक असल्याचं सांगितलं.

चर्चा पुढे नेण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची एक समिती बनवावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारनं दिला. मात्र समिती बनवायला शेतकऱ्यांनी नकार दिलाय. सरकारने सर्वांसोबत चर्चा करावी आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात, असं शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. सरकारनं ही बाब मान्य केली असून सर्वांसोबत चर्चा करायला तयार असल्याचं सांगितलं आहे.

दिल्लीतील विज्ञान भवनात झालेली ही बैठक सुमारे साडे तीन तास चालली. कृषी कायद्यांविषयी शेतकऱ्यांना असलेले आक्षेप त्यांनी सविस्तर मांडावेत आणि सरकार त्यावर तोडग्याचा विचार करेल, असं आश्वासन देण्यात आलं. याबाबत पुढची बैठक आता गुरुवारी होणार आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२४ गुरुवार
गुरुवार, जून २४, २०२१

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद वेळीच मान्यता न दिल्यास अधिक उग्र रुप धारण करेल, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.