दिल्ली | गाजीपूर सीमेवर शेतकरी आंदोलकांनी केले 'हवन' | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेटDecember, 23 2020

गाजीपूर सीमेवर शेतकरी आंदोलकांनी केले ‘हवन’

द्वारा- Prajakta Dhekale
डिजिटल कंटेन्ट रायटर
18:13 PMDec 23, 2020

२५ डिसेंबर पंतप्रधान शेतकऱ्यांशी संवाद साधणार

नवी दिल्ली : येत्या शुक्रवारी २५ डिसेंबरला माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते अयोध्येतील शेतकऱ्यांना कृषी कायद्यांमधली वैशिष्ट्ये समजावून सांगणार आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशातील भाजपा कार्यकर्ते हे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचं पत्र घरोघरी पोहचवणार आहेत. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी अयोध्येत शेतकऱ्यांसोबत जोडले  जाण्याचा भव्य कार्यक्रम होणार आहे. अयोध्येत एकूण ३७७ ठिकाणी तर संपूर्ण उत्तर प्रदेशात सुमारे अडीच हजार ठिकाणी शेतकऱ्यांना जोडले जाण्याच्या प्रक्रियेसाठी कार्यक्रम होणार आहे.

18:06 PMDec 23, 2020

आम्ही शेतकऱ्यांसोबत चर्चेस तयार आहोत... त्यांनी वेळ आणि तारीख ठरवावी - नरेंद्र सिंह तोमर

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर

नवी दिल्ली: शेतकरी आंदोलकांच्या प्रतिनिधींनी ठरवलेल्या तारीख व वेळेला सरकार त्यांच्या सोबत चर्चा करण्यास  तयार असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी दिली आहे. याबरोबरच  कायद्यामध्ये कोणत्या सुधारणा व दुरुस्त्या करायच्या आहेत हे ही सुचवण्यास सांगितले आहे.  मी आशा करतो की आंदोलक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आमच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात  निश्चित येतील. या चर्चेतून निश्चित उपाय  निघतील असेही ते म्हणाले आहेत. 

 माझी शेतकरी संघटनांना विनंती आहे , की कृषी कायदे तयार करण्य मागचा  सरकारचा उद्देश समजून घ्यावा. प्रत्येक क्रान्तीचा मार्ग हा चर्चेतूनच निघतो हा इतिहास आहे. आणि आपल्या देशात तर लोकशाही आहे. असेही तोमर यांनी म्हटले आहे. 

15:05 PMDec 23, 2020

शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळे थेट ग्राहकांपर्यत पोहोचविण्याकरिता ‘नोगा’ ब्रँडची मुल्यसाखळी विकसित करावी - कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई: राज्यातील शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक गटांचा भाजीपाला, फळे थेट ग्राहकांपर्यत पोहचविण्याकरता ‘नोगा’ ब्रँडखाली मुल्यसाखळी विकसित करण्यावर भर द्यावा. शहरी भागातील रहदारीच्या ठिकाणी व महामंडळाची मालकी असलेल्या जागेवर ‘नोगा’ उत्पादनांची विक्री स्थळे उभारावीत, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य कृषि उद्योग महामंडळाची आढावा बैठक कृषीमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कृषि उद्योग महामंडळाने ‘विकेल ते पिकेल’ या उपक्रमात सक्रीय सहभाग घेऊन लोकाभिमुख व्हावे, कृषीमंत्र्यांनी सांगितले.  यावेळी महामंडळाच्या तांत्रिक व लेखा विषयक बाबींचा घेतानाच पारंपरिक रासायनिक खते, किटकनाशके व कृषी  अवजरांसोबतच नाविन्यपूर्ण उत्पादने, ट्रायकोडर्मा, फेरोमन सापळे यांचे उत्पादन करून महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यावर भर दयावा, अशी सूचना भुसे यांनी केली. यावेळी त्यांनी महामंडळाची मालकी असलेल्या राज्यभरातील स्थावर जंगम मालमत्तेबाबत सविस्तर आढावा घेतला.

14:14 PMDec 23, 2020

सिंघुर सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

कृषी कायद्यांच्या विरोधात  दिल्ली -हरियाणाच्या  सिंघूर सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन अद्याप सुरूच आहे.  शेतकरी आंदोलकांच्या मते सरकारने   पाठवलेल्या पत्राचे उत्तर आम्ही आज देणार आहोत. आम्ही २४ तास बोलण्यासाठी तयार आहोत, पण ते आमचे ऐकून  घेण्यासाठी तयार नाही,कारण  त्यांच्या मनात खोट आहे. 

गाजीपूर सीमेवर शेतकरी आंदोलकांनी केले ‘हवन’
नवी दिल्ली: माजी पंतप्रधान चरणसिंह चौधरी यांच्या जयंतीच्या निमित्त साधत गाजीपूर सीमेवर शेतकरी आंदोलकांनी हवन केले. कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे मागील २६ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. दरम्यान शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची व केंद्र सरकारच्यामध्ये चर्चेच्या एकूण पाच बैठक पार पडल्या आहेत.

याशिवाय टिकरी बॉर्डरवर कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. आज राष्ट्रीय शेतकरी दिन असून, ‘यादिवशी कृषी कायदे मागे घेतल्याची भेट मोदी सरकारने आम्हाला द्यावी,कारण आजचा शेतकरी हा शिक्षित असून त्याला कायद्याची माहिती आहे.’ असल्याचे मत आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२४ शुक्रवार
शुक्रवार, सप्टेंबर २४, २०२१

राजकीय पक्षांची 'हायकमांड संस्कृती' ही पक्षांनाच मारक ठरते आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.