कडाक्याची थंडी व कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आंदोलन संपवावे – नरेंद्रसिंह तोमर

केंद्र सरकारने अत्यंत विचारपूर्व या कृषी कायदयांची निर्मिती केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात निश्चितच चांगला बदल घडून येणार असल्याचेही तोमर म्हणाले.

नवी दिल्ली: थंडीची मौसम तसेच कोरोनाचे संकटही अजून पूर्णपणे टाळलेलं नाही. अश्यात शेतकरी करत असलेले आंदोलन अत्यंत धोकादायक आहे. या आंदोलनामुळे दिल्लीतील नागरीकांना त्रासाचा सामाना करावा लागत आहे. सर्व सामान्य जनतेचा विचार करून शेतकऱ्यांनी हे आंदोलन संपवणे आवश्यक असल्याचे माता केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने अत्यंत विचारपूर्व या कृषी कायदयांची निर्मिती केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात निश्चितच चांगला बदल घडून येणार असल्याचेही तोमर म्हणाले.

शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून कृषी मंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार आणि शेतकरी नेत्यांत चर्चेच्या सहा फेऱ्या झाल्या. शेतकऱ्यांना आक्षेप असलेल्या सर्व मुद्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो आहे. पाच तारखेच्या बैठकीत सरकारने त्यांना विचारले की एपीएमसीचे सशक्तीकरण करण्यासाठी काय करावे, त्यावर शेतकरी नेते गप्प राहिले. सहाव्या फेरीच्या बैठकीत आम्ही शेतकऱ्यांच्या प्रत्येक समस्येचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. आम्ही एपीएमसी सशक्तीकरण करण्यासाठी उपाय समोर ठेवले. वीज संशोधन कायद्यावरही पहिल्यासारखीच व्यवस्था आणण्याचा विचार मांडला. शेतकरी नेत्यांनी यावर विचार केला पण अजून कोणताही रिप्लाय दिला नाही. माध्यमांच्या माध्यमातून आम्हाला समजले की शेतकरी नेत्यांनी सरकारचा प्रस्ताव नाकारले. त्यांच्याकडूनही अजून कोणताही चर्चेचा प्रस्ताव आला नाही. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले.