‘जे शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यांना कृषी कायद्यात काय समस्या आहेत हेच माहित नाही’ ;शेतकरी आंदोलनाबाबत हेमा मालिनीचे वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान शेतकरी व केंद्र सरकार यांच्यात आतापर्यंत झालेल्या बैठकांतून कोणत्याही प्रकारचा तोडगा निघू शकलेला नाही. सर्वोच्च न्यायालय नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी पुढील आदेशापर्यंत स्थगिती आणली असून यासंदर्भात अहवाल सादर करण्यासाठी एक समितीही स्थापन केली आहे

“आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना हेच माहित नाही, की त्यांना काय हवंय. नव्या कृषी कायद्यांबाबत समस्या काय याचीदेखील त्यांना माहिती नाही. यावरून ते कोणाच्यातरी सांगण्यावरून आंदोलनासाठी बसले आहेत हे स्पष्ट होतं,” असे मत व्यक्त करत भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांनी शेतकरी आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

हेमा मालिनी वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अनेक नेटकऱ्यांनी तुम्हाला पिकांची आधारभूत किंमत तरी माहिती आहे का? असे विचारले आहे. तर ‘एका नेटकऱ्याने तुमच्या संपूर्ण कुंटुंबातच विरोधाभास दिसून येतो पत्नी काहीतरी वेगळंच म्हणते, पती काहीतरी वेगळंचा बोलतो, मुलं काहीतरी वेगळच बोलतात. एकदा एकत्र बसून ठरावा नेमका काय बोलायचे आहे ते’, असे म्हटले आहे.

‘गोविंद राजु नावाच्या नेटकऱ्याने हेमा मालिनी यांचा संसदेतील उपस्थितीची पीडिएफ शेअर करत म्हटले आहे , की तुम्ही तर संसदेचा उपस्थित राहिला असता तर तुम्हाला कृषी कायद्यात काय आहे हे समजले असते. असे म्हटले आहे.

तब्बल ४९ दिवसांपासून शेतकऱ्याचे कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली हरियाणाच्या सिंघू सीमवर आंदोलन सुरू आहे. दरम्यान शेतकरी व केंद्र सरकार यांच्यात आतापर्यंत झालेल्या बैठकांतून कोणत्याही प्रकारचा तोडगा निघू शकलेला नाही. सर्वोच्च न्यायालय नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी पुढील आदेशापर्यंत स्थगिती आणली असून यासंदर्भात अहवाल सादर करण्यासाठी एक समितीही स्थापन केली आहे. परंतु शेतकऱ्यांनी त्या समितीलाही विरोध केला आहे.