रामदेवबाबांवर गुन्हा दाखल करा; IMA च्या मागणीने सरकारला टेन्शन

योग गुरु बाबा रामदेव यांनी नुकतीच अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केली होती. यावरुन इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आक्रमक पवित्रा घेतला असून केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियामध्ये बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये ते अ‍ॅलोपॅथी उपाचर पद्धतीविरोधात बोलताना दिसत आहेत. याची गंभीर देखल आयएमएने घेत केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे.

    दिल्ली : योग गुरु बाबा रामदेव यांनी नुकतीच अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केली होती. यावरुन इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आक्रमक पवित्रा घेतला असून केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियामध्ये बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये ते अ‍ॅलोपॅथी उपाचर पद्धतीविरोधात बोलताना दिसत आहेत. याची गंभीर देखल आयएमएने घेत केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे.

    कथित व्हिडिओत बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीबाबत केलेल्या आरोपांचा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी स्वीकार करावा आणि देशातील या आधुनिक चिकित्सापद्धतीचा भंग करावा किंवा बाबा रामदेव यांच्यावर महामारी रोग अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी जारी केलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

    व्हिडिओत बाबा रामदेव म्हणतात ‘अ‍ॅलोपॅथी एक मूर्ख आणि दिवाळ काढणारं विज्ञान आहे.’ पण जेव्हा बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण हे आजारी पडतात तेव्हा ते देखील अ‍ॅलोपॅथीचीच औषधे घेतात. त्यामुळे बाबा रामदेव अ‍ॅलोपॅथीवर बिनबुडाचे आरोप करत आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. कारण आपल्या बेकायदा आणि मंजुरी नसलेली औषध विकायची आहेत, असा आरोप आयएमएने केला.

    व्हायरल व्हिडिओमध्ये बाब रामदेव म्हणतात, ‘कोविड-19 महामारीमुळे होत असलेल्या मृत्यूंमागे अ‍ॅलोपॅथीचे कारण सांगण्यात आले आहे. अ‍ॅलोपॅथीची औषधे खाऊनच लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये न गेल्यानं आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झालेल्या मृत्यूंपेक्षा अधिक मृत्यू अ‍ॅलोपॅथीची औषधं खाऊन झाले आहेत.