Finally the decision of Maratha reservation; The Supreme Court will rule on petitions challenging the reservation

मराठा आरक्षण वैध ठरवण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्ट बुधवारी निर्णय देणार आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे संविधान पीठ उद्या सकाळी साडे दहाच्या सुमारास हा निर्णय देणार आहे. मराठा आरक्षणाचे भवितव्यच एका अर्थी उद्या ठरणार असून, मराठा समाजतील तरुणांना नोकरीतील आरक्षण, उच्च शिक्षणातील आरक्षण याबाबत उद्या निर्णय होणार आहे, याकडे संपूर्ण राज्याचे आणि देशाचे लक्ष असणार आहे.

    नवी दिल्ली :  मराठा आरक्षण वैध ठरवण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्ट बुधवारी निर्णय देणार आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे संविधान पीठ उद्या सकाळी साडे दहाच्या सुमारास हा निर्णय देणार आहे. मराठा आरक्षणाचे भवितव्यच एका अर्थी उद्या ठरणार असून, मराठा समाजतील तरुणांना नोकरीतील आरक्षण, उच्च शिक्षणातील आरक्षण याबाबत उद्या निर्णय होणार आहे, याकडे संपूर्ण राज्याचे आणि देशाचे लक्ष असणार आहे.

    सुप्रीम कोर्टाने यापूर्वी २६ मार्च रोजी या याचिकांवरील आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यापूर्वी १५ मार्चपासून या प्रकरणाची सुनावणी संविधान पीठापुढे करण्यात येत होती. या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीत बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा झाली होती. देशातील आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त असावी का, यावरही या निर्णयाच्या निमित्ताने पुनर्विचार होण्याची शक्यता आहे.

    २०१९ मध्ये राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार असताना, उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरवत, १२ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय दिला होता. राज्यात झालेल्या मराठा आंदोलनानंतर तत्कालीन राज्यसरकारने विधिमंडळात १६ टक्के आरक्षण मंजूर केले होते, मात्र त्याबाबत न्यायालयात झालेल्या सुनावणीत नोकऱ्यांमध्ये १२ टक्के तर नामांकनासाठी १३ टक्के आरक्षणाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते.