इंधन दरवाढीचे पुन्हा चटके, पेट्रोल डिझलचे आजचे दर काय?, जाणून घ्या

तेल वितरण कंपन्यांनी डिझलपेक्षा पेट्रोलच्या किंमतीत वाढ केली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव ३० पैसे, कोलकाता आणि मुंबईमद्ये २९ पैसेतर चेन्नईला २६ पैसे प्रति लीटर भाव वाढवण्यात आला आहे. तर डिझलच्या भावात दिल्ली, कोलकातामध्ये २६ पैसे प्रति लीटर आणि मुंबईत २८ पैसे, चेन्नईला २४ पैसे प्रति लीटर भाव वाढवण्यात आला आहे.

दिल्ली : देशात सलग सहाव्या दिवशी सोमवारी पेट्रोल (petrol ) आणि डिझलच्या (diesel)  दराचा आलेख चढताच पाहायला मिळत आहे. पेट्रोलच्या दर दिवसेंदिवस उच्चांग गाठत आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव ८३.७२ रुपये प्रति लीटर झाला आहे तर दिल्लीत मागे ८४ रुपये प्रति लीटरचा उच्चांकी भाव नोंदवला गेला आहे. जर पुढील काही दिवसांत पेट्रोल ३० पैसेंनी महागल्यास मागील ८४ रुपयांचा दर मोडीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (current rates of petrol and diesel)

डिझेलच्या तुलनेत पेट्रोलच्या दरात वाढ

तेल वितरण कंपन्यांनी डिझलपेक्षा पेट्रोलच्या किंमतीत वाढ केली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचा भाव ३० पैसे, कोलकाता आणि मुंबईमद्ये २९ पैसेतर चेन्नईला २६ पैसे प्रति लीटर भाव वाढवण्यात आला आहे. तर डिझलच्या भावात दिल्ली, कोलकातामध्ये २६ पैसे प्रति लीटर आणि मुंबईत २८ पैसे, चेन्नईला २४ पैसे प्रति लीटर भाव वाढवण्यात आला आहे.

हा आहे पेट्रोलचा भाव

इंडियन ऑयलच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई मध्ये पेट्रोलच्या दरात वाढ झाल्याने ८३.७१ रुपये, ८५.१९ रुपये, ९०.३४ रुपये आणि ८६.५१ रुपये प्रति लीटर दर झाला आहे.

ऑक्टोबर, २०१८ रोजी चार महानगरांमध्ये पेट्रोलची किंमत अनुक्रमे ८४ रुपये, ८५.५० रुपये, ९१.३४ रुपये ८७.३३ रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली होती, जी देशातील या शहरांमधील पेट्रोल दराची सर्वोच्च पातळी आहे. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये सोमवारी झालेल्या वाढीनंतर डिझेलचे दर अनुक्रमे ७३.८७ रुपये, ७७.४४ रुपये, ८०.५१ रुपये और ७९.२१ रुपयांवर पोहोचले आहेत.