जाणून घ्या .. शेतकरी आंदोलनातील व्हायरल पिझ्झाच्या फोटोवरून कोणत्या ‘कलाकारांनी’ नेटकऱ्यांना फटकारले

शेतकरी आंदोलनात शेतकरी पिझ्झा खाता असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून अनेक नेटकऱ्यांनी शेतकरी आंदोलकांवर टीका करण्यास सुरुवात केली. या नेटकऱ्यांच्या टीकेला गायक कलाकार दिलजीत दोसांज याने जोरदार प्रतिउत्तर दिले आहे .

 

नवी दिल्ली : नव्याने बनवण्यात आलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. सरकार जोपर्यंत कायदे रद्द करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सत्ताधारी पक्षाकडून सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीची टीका केली जात आहे . दरम्यान शेतकरी आंदोलनात शेतकरी पिझ्झा खाता असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल  झाले आहेत. हे फोटो पाहून अनेक नेटकऱ्यांनी शेतकरी आंदोलकांवर टीका करण्यास सुरुवात केली. या नेटकऱ्यांच्या टीकेला गायक कलाकार दिलजीत दोसांज याने जोरदार प्रतिउत्तर दिले आहे .

जेव्हा शेतकरी विष खात होते तेव्हा कुठे होता असा संतप्त सवाल विरोधकांना विचार आला आहे. ”शाबास जेव्हा शेतकरी विष घेत होते तेव्हा तुम्हाला कसलीच चिंता नव्हती अन आज पिझ्झा खाल्ला तर लगेच ब्रेकिंग न्यूझ झाली ”असे ट्विट त्याने केला आहे .

याबरोबरच अभिनेत्री स्वरा भास्करनेही

 

”शेतकरी गहूची शेती करतात ते गहूपासून तयार झालेला पिझ्झा खाऊ शकत नाही का? त्यांचे पाय मेहनतीचे प्रतिक आहेत. त्यांच्या मेहनतीमुळेच देशातील जमीन सुपीक बनते. यांना देखील पायांचा मसाज करण्याचा अधिकार आहे. कोण आहेत ते ज्यांना शेतकऱ्यांना कायम दरिद्री आणि लाचार परिस्थितीतच पाहायचं आहे” असाही सवाल तिने नेटकऱ्यांना विचाराला आहे.

शेतकऱ्यांचे आंदोलन मात्र दिवसेंदिवस धारधार होता चालले आहे. धरने आंदोलनाबरोबरच आज काही शेतकरी संघटने प्रमुख उपोषणासाठी बसले आहेत.