दिल्लीतील महाराष्ट्र सदनात शॉर्ट सक्रिटमुळे आग; पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल

आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी तातडीने रवाना झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहेत.

    नवी दिल्ली: दिल्ली येथे असलेल्या महाराष्ट्र सदनात आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांचे एक पथकही घटनास्थळी पोहोचल्याची माहिती मिळाली आहे.

    महाराष्ट्र सदनात राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षाला शॉर्ट सक्रिटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी तातडीने रवाना झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहेत. तसेच या घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनीही घटनास्थळाकडे धाव घेतल्याचे समजते.