संसद भवनात आग, अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल

संसद भवनच्या इमारतीत सकाळी ७.३० वाजता आम्हाला आग लागल्याची माहिती मिळाली. शॉर्ट सर्किटमुळे आगीची ही घटना घडण्याची शक्यता आहे असे त्यांनी सांगितले. आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे दिल्ली अग्निशमन सेवेचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले.

दिल्ली : सोमवारी सकाळी संसद भवन अ‍ॅनेक्सी इमारतीत भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दिल्लीच्या अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली होती.

संसद भवनच्या इमारतीत सकाळी ७.३० वाजता आम्हाला आग लागल्याची माहिती मिळाली. शॉर्ट सर्किटमुळे आगीची ही घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे दिल्ली अग्निशमन सेवेचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले.