कोरोनावरील लसीमुळे देशातील पहिल्या मृत्युची नोंद, लसीमुळे तब्येतीत बिघाड होऊन मृत्यू झाल्याचं सरकारनंही केलं मान्य

एका ६८ वर्षांच्या व्यक्तीला लसीकरणानंतर असह्य ऍलर्जी झाली आणि त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यु झाला. आतापर्यंत अशा प्रकारे ३१ जणांचा लसीकरणानंतर मृत्यू झालाय. या मृत्युंच्या कारणांचा सरकारी यंत्रणांमार्फत तपास करण्यात येत होता. त्यापैकी एका नागरिकाचा लसीकरणानंतर मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. 

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरायला सुरुवात झाली असताना कोरोनावरील लसीची ऍलर्जी झाल्यामुळे एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना नोंदवली गेलीय. सरकारी यंत्रणांनीदेखील या व्यक्तीचा मृत्यू कोरोनावरील लस घेतल्यानंतर आलेल्या रिऍक्शनमुळेच झाल्याचं मान्य केलंय.

    एका ६८ वर्षांच्या व्यक्तीला लसीकरणानंतर असह्य ऍलर्जी झाली आणि त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यु झाला. आतापर्यंत अशा प्रकारे ३१ जणांचा लसीकरणानंतर मृत्यू झालाय. या मृत्युंच्या कारणांचा सरकारी यंत्रणांमार्फत तपास करण्यात येत होता. त्यापैकी एका नागरिकाचा लसीकरणानंतर मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय.

    वैद्यकीय तज्ज्ञांच्या मतानुसार कोरोनावरील लस घेतल्यानंतर एक प्रकारची ऍलर्जिक रिऍक्शन येण्याची नेहमीच शक्यता असते. मात्र त्याचा जीवघेणा परिणाम फार कमी लोकांवर होतो. अगदी दुर्मिळ केसेसमध्ये अशी रिऍक्शन जिवावर बेतण्याची उदाहरणे घडू शकतात. भारतात कोट्यवधी नागरिकांचं लसीकरण झाल्यानंतर पहिल्या नागरिकाला असा त्रास झाला आहे.

    या घटनेमुळे नागरिकांनी घाबरून न जाता लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, असा सल्ला दिला  जातोय. लसीकरण करून घेणे, हाच कोरोनापासूनचा उत्तम बचाव असल्याचं वारंवार सांगितलं गेलंय. कोट्यवधी नागरिकांपैकी एखाद्याला अशी रिऍक्शन येऊ शकते, मात्र अशा घटना अत्यंत दुर्मिळ असल्याचं तज्ज्ञ सांगतात.