कोरोना लसीमुळे पहिला मृत्यू; केंद्राने दिली कबुली

कोरोना लस घेतल्यानंतर देशात पहिला मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना लसीमुळे एका 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालामधून ही बाब समोर आली आहे. लस दिल्यानंतर एखादा गंभीर आजार झाल्यास किंवा त्या व्यक्तीचा थेट मृत्यू झाल्यास त्याला वैज्ञानिक भाषेत अ‍ॅडवर्स इव्हेंट फॉलोइंग इम्यूनिझेशन अर्थात (एइएफआय) म्हणतात. अशा प्रकरणांची नोंद ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एइएफआयसाठी समिती स्थापन केली आहे.

    दिल्ली : कोरोना लस घेतल्यानंतर देशात पहिला मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना लसीमुळे एका 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालामधून ही बाब समोर आली आहे. लस दिल्यानंतर एखादा गंभीर आजार झाल्यास किंवा त्या व्यक्तीचा थेट मृत्यू झाल्यास त्याला वैज्ञानिक भाषेत अ‍ॅडवर्स इव्हेंट फॉलोइंग इम्यूनिझेशन अर्थात (एइएफआय) म्हणतात. अशा प्रकरणांची नोंद ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एइएफआयसाठी समिती स्थापन केली आहे.

    एइएफआय समितीचे चेअरमन डॉ. एन के अरोरा यांनी या पहिल्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मात्र, यासंदर्भात पुढे काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. या समितीने लसीकरणानंतर 31 मृत्यूंची माहिती घेतल्यानंतर अ‍ॅनाफिलेक्सिसमुळे 68 वर्षीय वयस्कर नागरिकाचा मृत्यू झाल्याचे मान्य केले आहे. असे होणे ही एक प्रकारची अ‍ॅलर्जीच आहे.

    या व्यक्तीला लसीचा पहिला डोस 8 मार्च 2021 रोजी दिला गेला होता. त्यानंतरच्या काही दिवसांतच त्याचा मृत्यू झाला आहे. लसीकरणानंतर प्रकृतीवर प्रतिकूल परिणामाच्या 26 हजार 200 केसेसची नोंद देशात झाली. यातील केवळ 488 रुग्णांचा मृत्यू झाला. 23 कोटी 50 लाख डोस घेतलेल्या नागरिकांच्या तुलनेत ही टक्केवारी केवळ 0.01 टक्के इतकी अत्यल्प आहे. यावरून लस घेणे सुरक्षितच असल्याचा मुद्दा अधोरेखित झाला.

    हे सुद्धा वाचा