एका माशामुळे मच्छिमार झाला मालामाल, इतक्या लाखांना मासा विकला गेल्याने त्याचं आयुष्यच बदललं

एक ४८ किलोचा दुर्मिळ मासा(Rare Fish) मच्छिमाराच्या हाती लागला. तो ज्या किमतीला विकला गेला ते ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

    नवी दिल्ली :मासे(Fish) पकडून ते विकून मच्छिमार (Fisherman)थोड्याफार प्रमाणात पैसे कमवत असतात. मात्र नुकत्याच घडलेल्या एक घटनेमध्ये एका माशामुळे मच्छिमार लखपती झाला आहे. एक ४८ किलोचा दुर्मिळ मासा(Rare Fish) या मच्छिमाराच्या हाती लागला. तो ज्या किमतीला विकला गेला ते ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

    क्रोकर (Croaker) नावाचा मासा ज्या नावेतून पकडला गेला, त्याच्या मालकाचं नाव साजिद हाजी अबाबकर असं आहे. ग्वादरातील फिशरीजचे उपसंचालक अहमद नदीम म्हणाले की आजपर्यंत त्यांनी इतक्या जास्त किमतीत कोणताही मासा विकला गेल्याचं पाहिलं नाही. हा मासा तब्बल ७२ लाख पाकिस्तानी रुपये म्हणजेच ३३ लाख भारतीय रुपयांमध्ये विकला गेला आहे.

    या माशासाठी ८६.४ लाख रुपयांपर्यंतची बोली लागली होती. मात्र, डिस्काऊंट देण्याची परंपरा असल्यानं शेवटी ७२ लाखांमध्ये हा मासा विकला गेला. मोठा क्रोकर मासा यूरोप आणि चीनमध्येही अत्यंत महाग आहे. काही मासे आपल्या चवदार मांसामुळे महाग असतात. मात्र, क्रोकर माशाचा औषधं आणि सर्जरीमध्ये वापर होत असल्याने त्याची किंमत जास्त आहे.

    याआधीही अब्दुल हक नावाच्या एका मच्छिमाराला क्रोकर मासा सापडला होता. मात्र, यासाठी त्याला केवळ ७.८० लाख रुपये मिळाले होते.