चुलते पारस यांच्या घराबाहेर अर्धा तास चिराग पासवान गाडीत बसून होते
चुलते पारस यांच्या घराबाहेर अर्धा तास चिराग पासवान गाडीत बसून होते

लोकजनशक्ती पक्षाचे एकूण ६ खासदार आहेत. त्यातील चिराग पासवान वगळता ५ खासदार आहेत. या ५ खासदारांपैकी कै. रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू पशुपती पारस हे एक खासदार आहेत,  तर पारस यांचा पुतण्याही खासदार आहे. या सर्वांनी मिळून पुन्हा एकदा एनडीएत जाण्याचा निर्णय घेतला असून चिराग पासवान एकाकी पडल्याचं चित्र निर्माण झालंय. 

    बिहारमध्ये लोकजनशक्ती पक्षात उभी फूट पडल्याचं चित्र निर्माण झालंय. लोकजनशक्ती पक्षाचे पाच खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना भेटले आणि आपण एनडीएत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. चिराग पासवान यांचे चुलते पशुपती पारस यांची सर्वांनी एकमतानं लोकसभेतील पक्षाचे नेते म्हणून निवड केल्याचंही जाहीर केलं.

    लोकजनशक्ती पक्षाचे एकूण ६ खासदार आहेत. त्यातील चिराग पासवान वगळता ५ खासदार आहेत. या ५ खासदारांपैकी कै. रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू पशुपती पारस हे एक खासदार आहेत,  तर पारस यांचा पुतण्याही खासदार आहे. या सर्वांनी मिळून पुन्हा एकदा एनडीएत जाण्याचा निर्णय घेतला असून चिराग पासवान एकाकी पडल्याचं चित्र निर्माण झालंय.

    चिराग पासवान सोमवारी सकाळी ११.३० वाजता काका पारस यांच्या भेटीसाठी दिल्लीतील त्यांच्या घरी गेले होते. त्या ठिकाणी सुमारे अर्धा तास बाहेर थांबवण्यात आलं. त्यांच्यासाठी घराचे दरवाजे उघडलेच नाहीत. त्यानंतर त्यांना आत नेऊन गेस्ट रुममध्ये बसवण्यात आलं आणि खा. पारस हे घरात नसल्याचं सांगण्यात आलं. काही वेळानंतर चिराग पासवान भेट न घेताच बाहेर पडले.

    दरम्यान, माध्यमांशी बोलताना मात्र पारस यांनी सर्व काही आलबेल असल्याचं सांगितलंय. चिराग पासवान हेच पक्षाचे अध्यक्ष राहतील, मात्र कै. रामविलास पासवान यांच्या मार्गाने जाण्याचा आमचा प्रयत्न राहिल, असं म्हटलंय. एनडीएतून बाहेर पडणं ही चूक होती आणि त्याचा फटका पक्षाला आणि एनडीएलही बसला, असं पारस यांनी म्हटलंय. त्यामुळे पुन्हा आपण ‘विकास पुरुष’ नितीश कुमार यांच्या पाठिशी उभे राहणार असल्याची घोषणा पारस यांनी केलीय.