पावसामुळे पाण्यात करंट उतराला अन.. एकाच कुटुंबातील पाच जणांचा गमवावा लागला जीव

पावसामुळे या खांबांमध्ये विद्युत प्रवाह पावसाच्या पाण्यात उतराला होता. त्यावेळी एकमेकांना वाचवण्याच्या नादात पाच जणांचा जीव गेल्याची माहिती गाझियाबादचे एसपी निपुण अग्रवाल यांनी दिली आहे.

    दिल्लीसह देशाच्या वेगवेगळ्या भागात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अशातच दिल्लीजवळचा असलेल्या गाझियाबादमध्ये मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. सिहानी गेट पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात राकेश मार्ग परिसरात मुसळधार पावसादरम्यान विजेचा करंट (electric shock)पसरला. यावेळी एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये पाच जणांचा विजेचा जोरदार धक्का बसून मृत्यू झाला. पाच जणांना विजेचा धक्का बसल्यावर आजूबाजूचे लोक त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी चार जणांना मृत घोषित केले. तर काही वेळाने अजून एकाचा मृत्यू झाला.

    सिहानी गेट पोलीस ठाणे क्षेत्रातील राकेश मार्ग परिसरामध्ये पान सिंह पॅलेसजवळ एका घराबाहेर शेड पडले होते. त्या शेडला लोखंडाचे खांब लावले होते. पावसामुळे या खांबांमध्ये विद्युत प्रवाह पावसाच्या पाण्यात उतराला होता. त्यावेळी एकमेकांना वाचवण्याच्या नादात पाच जणांचा जीव गेल्याची माहिती गाझियाबादचे एसपी निपुण अग्रवाल यांनी दिली आहे.
    मृतांमध्ये आई आणि मुलींचा समावेश आहे. आई जानकी, मुली लक्ष्मी, सुबी आणि सिमरन या चौघांचा मृत्यू झाला. तर एक अन्य व्यक्ती उपचारांदरम्यान मरण पावली आहे. घटनेदरम्यान नेमके काय घडले याचा शोध पोलीस घेत आहेत.