कंपनीने घेतला असा जबरदस्त निर्णय की… कुणीच कामाला नाय म्हणणार नाय

वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देण्यासह फ्लिपकार्टने 'Covid Care Leaves' ची देखील घोषणा देखील केली आहे. जर एखादा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला तर या योजनेअंतर्गत त्याला २८ दिवसांची सुट्टी दिली जाणार आहे. या सुट्टीचे पैसे देखील कापले जाणार नाही, पेड लीव्ह स्वरुपात ही सुट्टी दिली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

नवी दिल्ली : कोरोनाकाळात काम करण्याची पद्धतही बदलली आहे. कोरोना काळात वर्क फ्रॉम होम करत कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या कामात कोणताही खंड पडू दिला नाही.  कोरोनाचा (Coronavirus)कहर कमी झाला असला तरी संकट पूर्णपणे टळलेले नाही. प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट (Flipkart) ने महत्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने घेतलेल्या निर्णयामुळे कुणीच कामाला नाही म्हणणार नाही.

वॉलमार्ट (Walmart) चा मालकी हक्क असणाऱ्या फ्लिपकार्टने (Flipkart)त्यांच्या १२००० कर्मचाऱ्यांसाठी घरातून काम करण्याची सुविधा (Work From Home) आणखी काही काळासाठी वाढवली आहे. आता हे कर्मचारी मे २०२१ पर्यंत घरातूनच काम करणार आहेत. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता कंपनीने हा निर्णय घेतला असून ‘बँक टू ऑफिस प्लॅन’ चा दुसरा टप्पा पुढील वर्षी मे पर्यंत थांबवला आहे.

वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देण्यासह फ्लिपकार्टने ‘Covid Care Leaves’ ची देखील घोषणा देखील केली आहे. जर एखादा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला तर या योजनेअंतर्गत त्याला २८ दिवसांची सुट्टी दिली जाणार आहे. या सुट्टीचे पैसे देखील कापले जाणार नाही, पेड लीव्ह स्वरुपात ही सुट्टी दिली जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

काही दिवसांपूर्व Amazon कंपनीने देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांचा वर्क फ्रॉम होमचा कालावधी जून २०२१ पर्यंत वाढवला आहे.