हैदराबाद जिल्ह्यात पुराच्या पाण्याचा मानवी वस्त्यांमध्ये थैमान
हैदराबाद जिल्ह्यात पुराच्या पाण्याचा मानवी वस्त्यांमध्ये थैमान

दिल्ली(Delhi). गेल्या एक आठ‌ड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे हैदराबादमध्ये हाहाकार माजला आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबादला पुन्हा एकदा पावसाने झोडपले. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा जलप्रलयाचे संकट हैदराबादवर ओढवले आहे. आतापर्यंत हैदराबादमध्ये मुसळधार पावसाने 50 लोकांचा बळी घेतला आहे. अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक भागात पुरसृश स्थिती निर्माण झाली असून पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णत: विस्कळीत झाली आहे.

सरकारी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार शनिवारी रात्री साडेआठ ते रात्री 12 दरम्यान मेदचल मलकजगिरी जिल्ह्यातील सिंगापूर टाऊनशिपमध्ये 157.3 मिमी पावसाची नोंद झाली. तर उप्पलजवळ असलेल्या बंदलगौडामध्ये 153 मिमी पावसाची नोंद झाली. हैदराबादमधील अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या आपत्कालीन कृती दलाने (डीआरएफ) तातडीने काम सुरू केल्याचे विश्वजीत कामपटी (संचालक, दक्षता आणि आपत्कालीन व्यवस्थापन) यांनी ट्विट करून सांगितले. अब्दुल्लापुरमेट पोलिसांनी पाण्याच्या प्रवाहात अडकलेली कार जेसीबीच्या मदतीने काढली. दरम्यान, अतिवृष्टीने 50 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तेलंगणाचे सुमारे 5 हजार कोटींचे नुकसान झाल्याचा सरकारचा अंदाज आहे.

आणखी चार-पाच दिवस बरसणार
भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) बुधवारपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा जारी केल्यामुळे हैदराबादवरील संकट कायमच आहे. मुसळधार आणि गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे हैदराबादमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशातच, आयएमडीच्या माहितीनुसार हैदराबादमध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच येणाऱ्या आठवड्यातील मंगळवार, बुधवारी आणि गुरुवारी शहरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तेलंगणाचे महानगर आणि नगरविकास मंत्री केटी रामराव सातत्याने पूरग्रस्त भागाचा दौरा करून अधिकाऱ्यांना सुचना देत आहेत. बचाव पथक गरजूंना खाद्यपदार्थांची पाकिटे आणि औषधांचे वाटप करत आहेत. राजेंद्रनगर भागात नुकत्याच आलेल्या पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना राव यांनी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

हजारो एकर शेत पाण्याखाली
राज्यात हजारो एकर शेत पाण्याखाली गेले आहे. एनडीआरएफ आणि लष्कराला मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. लष्कराने बंदलगुडा भागात मदतीसाठी तुकडी रवाना केली. एनडीआरएफने हैदराबाद आणि रंगारेड्डी जिल्ह्यात एक हजाराहून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. दरम्यान, राज्यात बुधवारी आणि गुरुवारी सुटी जाहीर करण्यात आली.