‘या’ कारणामुळे अमेरिकेन प्रशासनाने घातली भारतीय हवाई वाहतुकीवर बंदी ; ४ मे पासून नियमांची अंमलबजावणी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संक्रमणाचे विविध प्रकारचे व्हेरियंट सापडत असल्याने हवाई प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जो बायडन प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच मागील १४ दिवसात भारतातून प्रवास करून आलेल्या प्रवाश्यांनाही अमेरिकेत प्रवेश दिला जाणार नसाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

    नवी दिल्ली: देशात वेगाने पसरट असलेलया कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अमेरिकेने भारतातून होणाऱ्या हवाई वाहतुकीच्या प्रवासावर बंदी घातली आहे. येत्या ४ मे पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती व्हाईट हाऊस प्रशासनाने दिली आहे.
    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संक्रमणाचे विविध प्रकारचे व्हेरियंट सापडत असल्याने हवाई प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जो बायडन प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच मागील १४ दिवसात भारतातून प्रवास करून आलेल्या प्रवाश्यांनाही अमेरिकेत प्रवेश दिला जाणार नसाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

    भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असल्याने देशातील नागरिकांनाही अमेरिकेत न जाण्याचा सल्ला अमेरिकेन प्रशासनाने दिला आहे.  भारतातील प्रवाशांवर बंदी घालणारा अमेरिका पहिला देश नाही. याआधीही ब्रिटन, इटली, जर्मनी, फ्रांस, यूएई, पाकिस्तान आणि सिंगापूरसह अनेक देशांनी अशाच प्रकारचे आदेश दिले आहेत. तर, दुसरीकडे कॅनडा, हाँगकाँग आणि न्यूझीलंडनंही भारतासोबतचे सर्व कमर्शियल प्रवास पुढे ढकलले आहेत.

    देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शुक्रवारी भारतात ३८६४५२ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर एकूण बाधितांची संख्या वाढून १८७६२९७६ वर पोहोचली आहे. तर, सध्या ३१ लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी ३४९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत २०८३३० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.