Finance Minister Nirmala Sitharaman

फोर्ब्सने आपल्या १७ व्या वार्षिक 'फोर्ब्स पावर लिस्ट' मध्ये जाहीर केलेल्या यादीमध्ये ३० देशातील महिलांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये काही महिला या देशांच्या प्रमुख आहेत. तर काही सीईओ आणि मनोरंजन क्षेत्रातील महिला आहेत.

दिल्ली : यंदाच्या म्हणजेच २०२० वर्षातील सर्वात शक्तीशाली महिलांची यादी (Forbes releases list of world’s most powerful women) फोर्ब्सकडून जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्याही नावाचा समावेश आहे. अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचाही समावेश आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीमध्ये सलग दहाव्या वर्षी जर्मनीच्या चान्सलर एजेंला मर्केल या प्रथम स्थानी कायम आहेत. तर दुसऱ्या स्थानी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न या यादीत आहेत. जेसिंडा आर्डर्न यांनी कोरोना काळात कडक नियमावली तयार करत न्यूझीलंड देशाला कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपासून वाचवले आहे.

फोर्ब्सने आपल्या १७ व्या वार्षिक ‘फोर्ब्स पावर लिस्ट’ मध्ये जाहीर केलेल्या यादीमध्ये ३० देशातील महिलांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये काही महिला या देशांच्या प्रमुख आहेत. तर काही सीईओ आणि मनोरंजन क्षेत्रातील महिला आहेत. या महिला वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. परंतु २०२० मध्ये आलेल्या आव्हानांवर त्यांनी चांगल्याप्रकारे सामना केला आहे.

फोर्ब्सच्या यादीत निर्मला सीतारामण ४१ स्थानी

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण या फोर्ब्सच्या यादीमध्ये ४१ स्थानी आहेत. बायोकॉनच्या संस्थापक किरण मजूमदार शॉ ६८ व्या स्थानी आहेत. आणि एचसीएल इंटरप्राईजच्या सीईओ रोशनी नडार मल्होत्रा ५५ व्या स्थानावर आहेत. तसेच लँडमार्क समूहाच्या प्रमुख रेणुका जगतियानी या यादीत ९८ व्या स्थानी आहेत.