दिल्लीत ढगांची दाटी, वादळी वाऱ्यासह कोसळणार गारांचा पाऊस

दिल्लीत मध्यरात्रीपासून काळ्या ढगांनी दाटी करायला सुुुरुवात केलीय. गेल्या काही तासांपासून दिल्लीत जोरदार वारेदेखील वाहत आहेत. त्यामुळे थंडीचा अनुभव घेतल्यानंतर आता अवकाळी पावसाचा सामना दिल्लीकरांना करावा लागणार आहे. दिल्लीतील वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान विभागानं दिलाय. त्याचप्रमाणे वादळी वाऱ्यांच्या सोबतीला गारांचा वर्षावदेखील होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केलीय. 

    गेले काही महिने कडाक्याची थंडी आणि धुकं अनुभवल्यानंतर आता दिल्लीकर एका वेगळ्या नैसर्गिक अवस्थेसाठी सज्ज होतायत. दिल्लीकर सध्या थंडीला निरोप देऊन उन्हाळ्याच्या तयारीला लागले आहेत. मात्र याच दरम्यान, आज (शुक्रवारी) पहाटे दिल्लीच्या आकाशात ढगांनी दाटी केलीय.

    दिल्लीत मध्यरात्रीपासून काळ्या ढगांनी दाटी करायला सुुुरुवात केलीय. गेल्या काही तासांपासून दिल्लीत जोरदार वारेदेखील वाहत आहेत. त्यामुळे थंडीचा अनुभव घेतल्यानंतर आता अवकाळी पावसाचा सामना दिल्लीकरांना करावा लागणार आहे. दिल्लीतील वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळेल, असा इशारा हवामान विभागानं दिलाय. त्याचप्रमाणे वादळी वाऱ्यांच्या सोबतीला गारांचा वर्षावदेखील होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केलीय.

    दिल्ली ही कडाक्याची थंडी आणि कडाक्याचा उकाडा यासाठी ओळखली जाते. यंदा कडाक्याच्या थंडीतही अनेकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. दिल्लीतील प्रदुषणाची पातळी सध्या अतिधोकादायक पातळीवर आहे. पाऊस पडल्यामुळे सर्वसामान्यांच्या जनजीवनावर परिणाम होत असला, तरी प्रदुषणाची पातळी सुधारण्यास त्याची मदत होत असल्याचं वेळोवेळी सिद्ध झालंय. पावसामुळे प्रदुषणाचे कण खाली बसतात आणि हवा साफ होते. त्यामुळे अधूनमधून होणाऱ्या पावसानंतर प्रदुषणाची पातळी कमी झाल्याची नोंददेखील यापूर्वी अनेकदा झालीय.

    दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर मात्र या बदलत्या आव्हानाचा चांगलाच परिणाम होतोय. कडाक्याच्या थंडीत दिवस काढल्यानंतर आता शेतकरी उन्हाळ्याच्या तयारीला लागले आहेत. त्यासाठी वेगळ्या प्रकारचे तंबू उभे केले जात आहेत. याच दरम्यान, पावसानं हजेरी लावल्यामुळे नवं संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहणार आहे.