corona vaccine update serum institute of india has now prepared 60 million vaccine dose

नवी दिल्ली : भारतीय लस येणाआधी परदेशी कोरोना लस भारतात एंन्ट्री करणार असल्याची शक्यता आहे. फायझर कंपनीने भारतात लस विक्री व वितरणाची परवानगी मागितली आहे.

भारतात करोना लस निर्मितीची प्रक्रिया वेगात सुरू आहेत. त्याआधीच परदेशातून लस येण्याची चिन्हं आहेत.फायझर इंडियाने केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे लसीच्या वापराबाबत परवानगी मागितली आहे.

असा अर्ज करणारी फायझर इंडिया पहिली औषधनिर्माण कंपनी ठरली आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनन सरकारनं फायझर व बायोएनटेकने विकसित केलेल्या लसीच्या वापराला परवानगी दिली होती. त्याचबरोबर बहारिनमध्येही लस वापरण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यानंतर फायझरने भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे.

लस आयात करण्याची, त्याचबरोबर देशभरात लसीची विक्री आणि वितरण करण्याची परवानगी फायझरने केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे केलेल्या अर्जात केली आहे.

नवीन औषधी व क्लिनिकल चाचणी नियम २०१९ नियमांतंर्गत सध्या सुरू असलेल्या चाचण्यामधून सूट देऊन अशा प्रकारची परवानगी देण्याची विशेष तरतूद असल्याची माहिती सूत्रांकडुन मिळाली आहे.

४ डिसेंबर रोजी फायझर इंडियाने अर्ज दाखल केला आहे. जगात फायझरच्या लशीचे २०२० मध्ये ५ कोटी डोस तयार केले जाणार आहेत.  २०२१ अखेर १.३ अब्ज डोस उपलब्ध केले जातील. एकूण १७० स्वयंसेवकांवर लशीचे प्रयोग करण्यात आले असून वय, वंश, लिंग या सर्व पातळ्यांवर फायझरची लस प्रभावी ठरली आहे.

ही लस वयस्कर व्यक्तींसह सर्वामध्ये ९५ टक्के प्रभावी ठरली आहे. दरम्यान, फायझरची लस खूप कमी तापमानात साठवावी लागते. यामुळे ही लस साठवण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.