Sonia Gandhi and Manmohan Singh are responsible for the defeat of the Congress in 2014, Pranab Mukherjee claims in the book

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा झाली नसल्यामुळे ते कोमात गेल्याचे आर्मी रुग्णालयाने सांगितले आहे. त्यांना जीवन रक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवार १० ऑगस्ट २०२० रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तसेच १० ऑगस्टला त्यांच्या मेंदूला आलेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा झाली नसल्यामुळे ते कोमात गेल्याचे आर्मी रुग्णालयाने सांगितले आहे. त्यांना जीवन रक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांच्या प्रकृतीत काही सुधारणा झाली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

तसेच सोशल मिडियावर प्रणव मुखर्जी यांचे निधन झाल्याची अफवा पसरली होती. या अफवेला दुजोरा देत प्रणव मुखर्जी यांच्या चिरंजीवांनी सांगितले की, माजी राष्ट्रपती प्रणाव मुखर्जी यांची प्रकृती ठीक आहे. त्यांचे निधन झालेल्या खोट्या अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवू नका. असे त्यांचा मुलगा म्हणाला.