माजी केंद्रीय मंत्री, अहमदनगरचे भाजप नेते दिलीप गांधी यांचे दिल्लीत निधन

गांधी यांनी तीनवेळा नगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार बनून प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दिल्लीतच होते, आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. दिलीप गांधी यांनी महाविद्यालयीन जीवनापासून भाजपच्या कामाला सुरुवात केली.

    दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे निधन झाले. दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. ते ६९ वर्षांचे होते. मंगळवारी त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटीव्ह आली होती, त्यानंतर त्यांच्यावर दिल्लीच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. दिलीप गांधी यांच्या पार्थिवावर दिल्लीतच अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे. मृत्यूसमयी पत्नी, दोन्ही मुले त्यांच्यासमवेत दिल्लीतच होती.

    गांधी यांनी तीनवेळा नगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार बनून प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दिल्लीतच होते, आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. दिलीप गांधी यांनी महाविद्यालयीन जीवनापासून भाजपच्या कामाला सुरुवात केली. भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी अहमदनगर शहराध्यक्षाची पदांची जबाबदारी त्यांनी पार पाडली. १९८५ते १९९९ पर्यंत अहमदनगर नगरपालिकाचे उपाध्‍यक्ष म्हणून काम पाहिले.