भारतात कोरोनाचे चार लाख 312 बळी; तिसरी लाट अधिक घातक ठरणार आणि…

एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या रुग्णालयांच्या दुर्घटना पाहता भारतातील मृत्यूची संख्या दहा लाखांहून अधिक असल्याचे अनेक तज्ञांचे मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारीत या विषाणू विरोधात लढाई जिंकल्याची घोषणा केल्यानंतर सरकारचे आत्मसंतुष्ट होणे आणि कोरोनाचा नवीन डेल्टा व्हेरीएंट यामुळे इतकी मोठी हानी झाल्याने तज्ञ सांगत आहेत. आता कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटल्याने अनेक निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी महिन्यात पुन्हा एकदा कोरोनाची मोठी लाट येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

  दिल्ली : कोरोना महामारीनंतर देशात लसीकरण सुरू होऊन आता सहा महिने होत आले आहेत. मात्र, लसीकरण मोहिमेची गती मंदावल्यामुळे देशाला मोठा फटका बसला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे 4 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होणारा भारत तिसरा देश ठरला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, कोरोना संसर्गामुळे देशात एकूण 4 लाख 312 लोकांचे मृत्यू झाले आहेत. मृत्यूच्या बाबतीत आता युनायटेड स्टेट्स आणि ब्राझील आपल्यापुढे आहे.

  केंद्राचे आत्मसंतुष्ट धोरण नडले

  एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या रुग्णालयांच्या दुर्घटना पाहता भारतातील मृत्यूची संख्या दहा लाखांहून अधिक असल्याचे अनेक तज्ञांचे मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारीत या विषाणू विरोधात लढाई जिंकल्याची घोषणा केल्यानंतर सरकारचे आत्मसंतुष्ट होणे आणि कोरोनाचा नवीन डेल्टा व्हेरीएंट यामुळे इतकी मोठी हानी झाल्याने तज्ञ सांगत आहेत. आता कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटल्याने अनेक निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी महिन्यात पुन्हा एकदा कोरोनाची मोठी लाट येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

  तिसरी लाट ठरणार घातक

  यावर्षी देशातील सर्व 1.1 अब्ज प्रौढांना लसी देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मात्र, लस टंचाई, प्रशासकीय गोंधळ आणि लोकांमध्ये असलेला गैरसमज यामुळे केवळ पाच टक्के लोकांना आतापर्यंत दोन डोस मिळाले आहेत. 21 जून रोजी सरकारने सर्व प्रौढांसाठी लस मोफत देण्याची मोहीम सुरू केली आहे. यामुळे एका दिवसात 90 लाखांहून अधिक लसीच्या डोसची मागणी वाढली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, दैनदिन लसीकरणाचा वेग पुन्हा कमी झाला आहे. गेल्या आठवड्यात दररोज सरासरी 40 लाखांपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले आहे.

  या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सरकारी प्रतिज्ञापत्रात सरकारने ऑगस्ट ते डिसेंबरदरम्यान उपलब्ध होणाऱ्या डोसची संख्या 1.35 अब्ज कमी केली असून आधीच्या अंदाजानुसार 2.16 अब्ज इतकी होती. त्यामुळे लसीकरणाचा वेग पाहता आगामी काळाती कोरोनाची तिसरी लाट मोठे नुकसान करण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.