Corona Updatesमुलांमध्ये कोरोना व्हायरसची ‘ही’ असू शकतात सुरुवातीची लक्षणे, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

बर्‍याच दिवसानंतर कोरोनाची लागण झालेला लहान वयाचा रुग्ण आढळल्यामुळे रुग्णालय आणि आरोग्य विभागही सतर्क झाले आहे. या मुलाचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

    नोएडा: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात आहे. यामध्ये लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे बोलले जात आहे. अशातच काळजी वाढवणारी घटना समोर आली आहे. दिल्लीतील नोएडा सेक्टरमधील चाइल्ड पीजीआयमध्ये चार वर्षांच्या मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे दाखल करण्यात आले आहे. मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर या मुलाला सेक्टर-२९ मधील भारद्वाज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला पुढील उपचारांसाठी येथील सेक्टर-३० मधील सुपर स्पेशालिटी पेडियाट्रिक अँड पोस्ट ग्रॅज्युएट टीचिंग इन्स्टिट्यूट (चाइल्ड पीजीआय) येथे पाठविण्यात आले.

    कोरोनाची दुसरी लाट ओरसल्यानंतर पहिल्यांदाच सर्वात लहान वयाचा कोरोना रुग्ण आढळल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले असून, यामुळे रुग्णालय प्रशासन व आरोग्य विभागही सर्तक झाला आहे. या लहान मुलाल तीव्र ताप, खोकला आणि सर्दी आहे. तसेच, पोटात पाणी भरले आहे.

    बर्‍याच दिवसानंतर कोरोनाची लागण झालेला लहान वयाचा रुग्ण आढळल्यामुळे रुग्णालय आणि आरोग्य विभागही सतर्क झाले आहे. या मुलाचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच, या मुलाच्या कुटुंबीयांची आणि त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही आरटीपीसीआर चाचणी केली जात आहे. चाइल्ड पीजीआयच्या संचालक डॉ. ज्योत्स्ना मदन यांनी सांगितले की, मुलाला दुपारी एक वाजेच्या सुमारास रुग्णालयात आणले गेले, त्यानंतर त्याची आपत्कालीन परिस्थिती पाहता त्याला वॉर्डात दाखल करण्यात आले. मुलाला तीव्र ताप, खोकला आणि सर्दी आहे. तसेच, पोटात पाणी भरले आहे.

    पालकांनो काळजी घ्या ; मुलांमध्ये दिसतायत कोरोनाची ही लक्षणे
    ताप, खोकला, श्वास लागणे, थकवा, घसा खवखवणे, अतिसार, गंध कमी होणे, चव कमी होणे, जठरासंबंधी आजाराची लक्षणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, कोरडा खोकला आणि स्नायू दुखणे यांसारखी लक्षणे लहान मुलांमध्ये आढळून येतात. मुलांमध्ये ही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या