France's participation in Quad countries' war games Alarm bells for China

भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वॉड देशांच्या युद्धसरावात फ्रान्सने भाग घेतल्याने तो चीनसाठी एक इशारा असल्याचे समजण्यात येते. क्वॉड देशांचा युद्धसराव तीन दिवस चालणार आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनच्या वाढत्या दादागिरीला शह देण्यासाठी हे चार देश एकत्र आले आहेत. त्यामुळे हिंदी महासागरात सुरू असलेला हा युद्धसराव महत्त्वाचा मानला जातो.

    दिल्ली : इंडो-पॅसिफिक प्रदेश हा मुक्त आणि सुरक्षित राहिला पाहिजे तसेच या प्रदेशातील सर्वांचे समान हितसंबंध जपले पाहिजेत यासाठी हिंदी महासागरात सोमवारपासून क्वाड देशांचा युद्धसराव सुरू झाला आहे. आता या युद्धासरावात फ्रान्सने भाग घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या क्वॉड देशांच्या युद्धसरावात फ्रान्सने भाग घेतल्याने तो चीनसाठी एक इशारा असल्याचे समजण्यात येते. क्वॉड देशांचा युद्धसराव तीन दिवस चालणार आहे. इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनच्या वाढत्या दादागिरीला शह देण्यासाठी हे चार देश एकत्र आले आहेत. त्यामुळे हिंदी महासागरात सुरू असलेला हा युद्धसराव महत्त्वाचा मानला जातो.

    त्यातच आता फ्रान्सचा सहभाग झाल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या युद्धसरावाला 18 व्या शतकातील फ्रान्सच्या नौदल अधिकारी ‘पेरॉस’ यांचे नाव देण्यात आले आहे. चीन या देशांच्या हालचालीवर बारीक नजर ठेऊन आहे.