beware fast tag lanes double toll collection november 2020

नवी दिल्ली : १ जानेवारी २०२१ पासून टोल नाक्यावरील सर्व कॅश लेन डेडिकेटेड FASTag लेनमध्ये रुपांतरित केल्या जातील. ही सुविधा हळू हळू फास्टॅग लेनमधील सर्व लेनमध्ये रूपांतरित केली जाणार असल्याने कोणत्याही टोल प्लाझावर रोख पैसे घेतले जाणार नाहीत. फास्टॅग(FASTag) अथवा प्रीपेड टच अँड गो कार्डने (Prepaid touch and go card service) टोल भरावा लागणार आहे.

फास्टॅग नसल्यास, आपली कार टोल पार करू शकणार नाही. वाहनचालकांसाठी फास्टॅग (FASTag) अनिर्वाय आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, जर तुमच्या कारचे फास्टॅग योग्यरित्या कार्यरत नसेल किंवा त्यामध्ये शिल्लक नसेल तरी देखील टोल प्लाझाच्या फास्टॅग लेनमध्ये प्रवेश केल्यास तुम्हाला डबल कर आकारला जाणार आहे. एखादी खासगी कार किंवा टॅक्सी चालवायची असेल तर वाहनचालकांकडे फॉस्टॅग असणं आवश्यक आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सरकारने काही सूट दिल्यानंतर सर्व गाड्यांवर फॉस्टॅग अनिवार्य केला होता. अलीकडेच जुन्या गाड्यांवर देखील FASTag अनिवार्य करण्यात आला आहे. FASTag नसणाऱ्यांकडून दुप्पट पैसे वसूल करण्याच्या सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.

फास्टॅग नसेल आणि तुम्हाला दुप्पट कर भरणं टाळायचं असेल तर प्रीपेड टच अँड गो कार्ड सेवा (Prepaid touch and go card service) वापरावी लागेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) टोल प्लाझावर गर्दी कमी करण्यासाठी 1 जानेवारीपासून सर्व हायब्रीड लेनवर प्री-पेड कार्ड सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही प्री-पेड कार्ड्स रोखीच्या व्यवहारास पर्याय आहेत. जर तुमच्या गाडीवर FASTag नसेल तर आपण टोल नाक्यावर पॉईंट-ऑफ-सेल्स (PoS) कडून हे प्री-पेड कार्ड खरेदी करू शकता आणि FASTag ऐवजी हे कार्ड वापरल्यास टोल दुप्पट होणार नाही.