इंधनाच्या दरात पुन्हा एकदा घट; सर्व सामान्यांना मोठा दिलासा, मुंबईत काय आहेत दर?

इंधनाच्या दरात घट केल्यानंतर मंगळवारी राजधानीत पेट्रोलचा दर ९०.५६ रुपये आहे, तर डिझेल ८०.८७ रुपये प्रतिलिटर दराने विकलं जात आहे. दर मुंबईत पेट्रोलची किंमत ९६.९८ रुपये एवढी आहे, तर डिझेलची किंमत प्रतिलिटर ८७.९६ रुपये इतकी आहे.

    नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्व सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशात आज पेट्रोल प्रतिलिटर २२ पैशांनी तर डिझेल २३ पैशांनी स्वस्त झालं आहे. इंधनाच्या दरात घट केल्यानंतर मंगळवारी राजधानीत पेट्रोलचा दर ९०.५६ रुपये आहे, तर डिझेल ८०.८७ रुपये प्रतिलिटर दराने विकलं जात आहे. दर मुंबईत पेट्रोलची किंमत ९६.९८ रुपये एवढी आहे, तर डिझेलची किंमत प्रतिलिटर ८७.९६ रुपये इतकी आहे.

    दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होत असतो. इंधनाचे नवीन दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. त्याचबरोबर परदेशी चलनाच्या किंमतीसोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, यावरून देशातील इंधनाच्या किमती ठरवल्या जातात.