केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरींच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन वाहनांसाठी भारत सिरीजची अधिसूचना जारी केल्यानंतर पुढच्या मोहिमेकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. गाड्यांच्या क्रमांकांसंदर्भातील गोंधळ कमी करण्यासाठी बीएच सिरीजची घोषणा केल्यानंतर आता गडकरींनी आपला मोर्चा कर्णकर्कश हॉर्न्सकडे वळवला असून लवकरच यासंदर्भात मोठे बदल केले जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

    दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरींच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन वाहनांसाठी भारत सिरीजची अधिसूचना जारी केल्यानंतर पुढच्या मोहिमेकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. गाड्यांच्या क्रमांकांसंदर्भातील गोंधळ कमी करण्यासाठी बीएच सिरीजची घोषणा केल्यानंतर आता गडकरींनी आपला मोर्चा कर्णकर्कश हॉर्न्सकडे वळवला असून लवकरच यासंदर्भात मोठे बदल केले जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

    गाड्यांच्या हॉर्नमध्ये बदल करण्यात येणार असून यासाठी लवकरच नवीन नियम बनवले जाणार आहे, असे गडकरी म्हणाले. विशेष म्हणजे हे नियम थेट वाहननिर्मात्या कंपन्यांसाठी असणार आहेत.

    गडकरी यांनी आपल्या खासगी अनुभवाचा संदर्भ देत एक घोषणा केली. मी नागपूरमध्ये 11 व्या मजल्यावर राहतो. तिथे रोज सकाळी मी एक तास प्राणायाम करतो. मात्र सकाळची शांतता गाड्यांच्या हॉर्नमुळे भंग होते. हा त्रास झाल्यानंतर मी यासंदर्भात विचार केला असता गाड्यांचे हॉर्न हे ऐकण्यासाठी योग्य पद्धतीचे असले पाहिजेत असा विचार मनात आला.

    त्यामधूनच आता गाड्यांच्या हॉर्नचे आवाज हे भारतीय वाद्यांचे असावेत असा विचार आम्ही सुरु केला असून त्यासंदर्भात काम सुरु आहे, असे गडकरींनी सांगितले. हॉर्नच्या आवाजामध्ये तबला, पेटी, व्हॉयलिन, बिगूल, तानपुरा, बासरी यासारख्या वाद्यांच्या आवाजाचा समावेश करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

    हॉर्न हे ऐकण्यासाठी योग्य असायला हवेत याबद्दल लवकरच नवीन नियम बनवून त्यासंदर्भातील कायदा लागू केला जाणार आहे. यापैकी काही नियम हे थेट वाहननिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना लागू केले जाणार आहेत, असे गडकरींनी सांगितले. त्यामुळे गाडी कारखान्यामधून बनवून येताच त्यामध्ये या वाद्यांचा आवाज असणारे हॉर्न असणार आहेत.