गौतम अदानींची २०२१मध्ये सर्वाधिक कमाई; जेफ बेझोस, एलोन मस्क यांनाही दिली मात

गौतम अदानी यांनी 2021 या आर्थिक वर्षात अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळविले आहे. त्यांची आर्थिक मिळकत जेफ बेझोस आणि एलोन मस्क या अब्जाधीशांनाही मागे टाकणारी आहे. त्यांच्या अदानी पोर्ट्स ते अदानी पॉवर प्लांट्स अशा विविध उपक्रमांमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. या पार्श्वभूमीवरच त्यांना हा नफा झाल्याचे समजते.

    दिल्ली (Delhi).  गौतम अदानी यांनी 2021 या आर्थिक वर्षात अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळविले आहे. त्यांची आर्थिक मिळकत जेफ बेझोस आणि एलोन मस्क या अब्जाधीशांनाही मागे टाकणारी आहे. त्यांच्या अदानी पोर्ट्स ते अदानी पॉवर प्लांट्स अशा विविध उपक्रमांमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. या पार्श्वभूमीवरच त्यांना हा नफा झाल्याचे समजते.

    ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार २०२१ साली १६.२ अब्ज डॉलर्सची उलाढाल झाली. यामुळे २०२१ मधल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती या मानांकनासाठी झगडणाऱ्या जेफ बेझोस आणि एलोन मस्क यांनाही अदानी यांनी मागे टाकले आहे. एक वगळता इतर सर्व अदानी समूहाच्या शेअर्सच्या किंमतीत कमीत कमी ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलियातील वादग्रस्त कारमायकल कोळसा प्रकल्प वगळता अदानी भारतातील बंदरे, विमानतळ, डेटा सेंटर आणि कोळसा खाणींचा विस्तार वेगाने करीत आहेत.

    नायका अ‍ॅडव्हायझरी सर्व्हिसेसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील चांदिरमाणि म्हणाले, “बाजारपेठेतील अनुकूल असणार्‍या क्षेत्रात अदानी सतत आपला व्यवसाय वाढवत आहेत. आता डेटा सेंटर व्यवसायात प्रवेश केल्याने, या गटाने तंत्रज्ञानात असलेली आपली इच्छा देखील दर्शविली आहे.” अदानी एंटरप्राईजेस लिमिटेडने गेल्या महिन्यात भारतात एक गीगावॅट क्षमतेचा डेटा सेंटर विकसित करण्यासाठी एक करार केला होता.

    या वर्षी अदानी टोटल गॅस लिमिटेडमध्ये ९६ टक्क्यांची वाढ झाली आहे तर अदानी एंटरप्रायजेसमध्ये ९० टक्क्यांची वाढ झाली आहे. अदानी ट्रान्समिशन लिमिटेड ७९ टक्के वाढली आहे. अदानी पॉवर लि. आणि अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लि. यामध्ये यावर्षी ५२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ५०० टक्क्यांनी वाढल्यानंतर अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये आतापर्यंत १२ टक्क्यांची वाढ झाली आहे.