सरसकट सर्वांना कोरोनाची लस द्या; राहुल गांधींची मागणी

देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना कोरोनाच्या लसीकरणावरून राजकारण सुरू झाल्याचे दिसून येते. कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारने वयाची ठराविक अट लादली असताना सरसकट सर्वांनाच कोरोनाची लस देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.

    दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना कोरोनाच्या लसीकरणावरून राजकारण सुरू झाल्याचे दिसून येते. कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारने वयाची ठराविक अट लादली असताना सरसकट सर्वांनाच कोरोनाची लस देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.

    वयाची अट घालणे म्हणजे निरर्थक वाद आहे असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, गरजांवर वादविवाद करणे मुर्खपणा आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे. देशातील कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रम पद्धतशीरपणे राबविण्यात येत असून टप्प्या-टप्प्याने सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

    देशातील डॉक्टरांची अग्रणी असलेली संस्था इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी लसीकरणासाठी देशभरात वयाची अट 18 इतकी करावी अशा मागणीचे पत्र पंतप्रधानांना लिहिले आहे.