subramanyam swami

चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ राज्यात प्रचंड नुकसान झाले. अशावेळी तिन्ही राज्यांना केंद्र सरकारने मदत करणे गरजेचे होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरातसाठीच आर्थिक मदतीची घोषणा केली. महाराष्ट्र आणि केरळला अद्याप केंद्राकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. यावरून भाजपाविरोधी पक्षाने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली आहे.

    दिल्ली : चक्रीवादळामुळे महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ राज्यात प्रचंड नुकसान झाले. अशावेळी तिन्ही राज्यांना केंद्र सरकारने मदत करणे गरजेचे होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ गुजरातसाठीच आर्थिक मदतीची घोषणा केली. महाराष्ट्र आणि केरळला अद्याप केंद्राकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. यावरून भाजपाविरोधी पक्षाने केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली आहे.

    यावरून, भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनीदेखील पंतप्रधान मोदी यांना घरचा आहेर दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्र आणि केरळला गुजरातपेक्षा जास्त मदत करावी, अशी मागणी स्वामी यांनी केली आहे.

    चक्रीवादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातची हवाई पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी एकट्या गुजरताला एक हजार कोटी रुपयांच्या आर्थ‍िक मदतीची घोषणा करून राज्य सरकारला मदतीचा धनादेशही दिला होता. त्यावरून स्वामी यांनी ट्विट केले आहे.

    त्यात ते म्हणाले, की पंतप्रधान गुजरातला गेले आणि त्यांनी जाहीर केल्याप्रमाणे एक हजार कोटी रुपयांचा धनादेश दिला. आता त्यांनी प्रामाणिकपणे यापेक्षा अधिक रकमेचा धनादेश महाराष्ट्र आणि केरळला दिला पाहिजे. या ठिकाणी अधिक नुकसान झाले आहे. मात्र, मोदींना त्याची पाहणी करण्यासाठी जाता आले नाही.