'Glacier Blood' seen on the glacier; The research found shocking information

संपूर्णपणे बर्फाने आच्छादलेल्या हिमनदीवर अचानक दिसणाऱ्या लाल डागामुळे संशोधक बुचकळ्यात पडले आहे. हा डाग कशामुळे आला असेल, याविषयी संशोधन सुरू केले असता त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैज्ञानिक भाषेत हिमनदीवरील लाल रंगाच्या मोठ्या डागाला 'ग्लेशिअर ब्लड' असे संबोधले जाते. संपूर्णपणे शुभ्र रंगाने रंगलेल्या भागावर असे अचानक रक्ताने माखलेल्या रंगाचा डाग दिसल्याने संशोधकदेखील हैराण झाले आहेत. यामागे एका रहस्यमय प्राणी असल्याचे सांगण्यात येत आहे.

  दिल्ली : संपूर्णपणे बर्फाने आच्छादलेल्या हिमनदीवर अचानक दिसणाऱ्या लाल डागामुळे संशोधक बुचकळ्यात पडले आहे. हा डाग कशामुळे आला असेल, याविषयी संशोधन सुरू केले असता त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैज्ञानिक भाषेत हिमनदीवरील लाल रंगाच्या मोठ्या डागाला ‘ग्लेशिअर ब्लड’ असे संबोधले जाते. संपूर्णपणे शुभ्र रंगाने रंगलेल्या भागावर असे अचानक रक्ताने माखलेल्या रंगाचा डाग दिसल्याने संशोधकदेखील हैराण झाले आहेत. यामागे एका रहस्यमय प्राणी असल्याचे सांगण्यात येत आहे.

  काय आहे प्रकरण?

  फ्रान्सच्या आल्प्स पर्वतरांगांमधील हिमनद्यांवर संशोधन करण्याचा एक प्रकल्प वैज्ञानिकांनी हाती घेतला आहे. यात 3,280 फूटांपासून ते 9,842 फूट उंचीवर गोठलेल्या हिमनद्यांमध्ये दिसून येणाऱ्या रक्तासारख्या लाल रंगाच्या द्रव्यावर संशोधन करत आहेत. हिमनद्यांवरील लाल रंगाचे संशोधन करणाऱ्या प्रकल्पाचे समन्वयक अॅरिक मार्शल यांनी सांगितले की, एका खास प्रकारच्या मायक्रोएल्गीमुळे (जलचर) हिमनद्यांमध्ये लाल रंग दिसून येत आहे. पाण्यात राहणाऱ्या या मायक्रोएल्गीवर पर्यावरणीय बदलांचा परिणाम होत असतो आणि त्यामुळेच त्या अशा प्रकारचा लाल रंग सोडतात असे मार्शल यांनी सांगितले.

  असे आहे कारण

  मायक्रोएल्गीवर पर्यावरण बदल आणि प्रदूषणाचा परिणाम होत असल्याने अॅलर्जी निर्माण होऊन ते लाल रंग मागे सोडतात त्यामुळे हा संपूर्ण परिसर लाल रंगाने व्यापला आहे, असे मार्शन यांनी सांगितले. मायक्रोएल्गी अतिशय सूक्ष्म स्वरूपाचे असतात पण ते जेव्हा एका ठिकाणी कळपाने जमा होतात तेव्हा त्यांचे अस्तित्व जाणवू लागते. त्यांचे प्रमाण आता खूप मोठ्या प्रमाणात आल्प्समध्ये वाढू लागले आहे.

  हे सुद्धा वाचा