सोने आणि चांदीत घट, 10 ग्रॅम सोन्याचा भाव ; काय आहेत दर?

सोन्याप्रमाणे चांदीच्या दरात घसरण होण्याचा ट्रेंड कायम आहे. दिल्ली सराफा बाजारात चांदीची किंमत 209 रुपयांनी घसरून 62,258 रुपये प्रति किलो झाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत 99.9 टक्के सोने 2 रुपयांनी वाढून 46,171 रुपये झाले.

    नवी दिल्लीः सोने आणि चांदीच्या भावात आज पुन्हा एकदा घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची मागणी घटल्यामुळे शुक्रवारी किंमती घसरल्या. मात्र, सोन्याच्या किंमतीत थोडा बदल झाला. देराजधानी दिल्लीमध्ये 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 2 रुपयांची किंचित वाढ झाली. त्याचबरोबर या काळात चांदी 200 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

    सोन्याप्रमाणे चांदीच्या दरात घसरण होण्याचा ट्रेंड कायम आहे. दिल्ली सराफा बाजारात चांदीची किंमत 209 रुपयांनी घसरून 62,258 रुपये प्रति किलो झाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत 99.9 टक्के सोने 2 रुपयांनी वाढून 46,171 रुपये झाले. त्याच वेळी फक्त एक दिवस आधी म्हणजे गुरुवारी, सोन्याचे भाव व्यवहार संपल्यावर 46,169 वर बंद झाले.

    तज्ज्ञांच्या मते, लवकरच सोने 50,000 रुपयांपर्यंत पोहोचेल. अशा परिस्थितीत गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ आहे.  एखाद्या गुंतवणूकदाराने आधीच सोन्यात गुंतवणूक सुरू ठेवली असेल, तर आता ती धारण करणे फायदेशीर ठरू शकते.